"मी शेतीसाठी नोकरी सोडली"; वडील-भावाला जमलं नाही ते लेकीने केलं, कमावले 1 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 03:02 PM2023-05-09T15:02:48+5:302023-05-09T15:10:27+5:30
वडील आणि भावांने शेतीकडे पाठ फिरवत दुसरं काहीतरी काम करायचं ठरवलं होतं. रोजाने यातून वर्षाला एक कोटी रुपये कमवून दाखवले.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत (MNC) नोकरी मिळवणं हे बहुतेक लोकांचं स्वप्न असतं. रोजा रेड्डी सक्सेस यांच्या बाबतीत ही गोष्ट थोडी उलट आहे. एका आघाडीच्या टेक्नॉलॉजी फर्ममधली नोकरी सोडून तिने शेतीलाच आपले सर्वस्व बनवलं. शेतकरी होण्याचं तिचं स्वप्न होतं. शेतीसाठी तिने घरच्यांशी भांडणही केलं. वडील आणि भावांने शेतीकडे पाठ फिरवत दुसरं काहीतरी काम करायचं ठरवलं होतं. रोजाने यातून वर्षाला एक कोटी रुपये कमवून दाखवले.
रोजा आता नोकरी सोडून शेतकरी झाली आहे. आज सगळेच तिचं कौतुक करतात. शेती हा मोठा उद्योग असल्याचं तिने सिद्ध केलं. रोजाचा जन्म कर्नाटकातील डोन्नेहल्ली गावात झाला. कुटुंबीय शेती करायचे. घरातील सदस्यांची इच्छा होती की तिने शेतीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी शहरात राहून अभ्यास करून काम करावं. पण, जेव्हा कोरोनाची साथ आली तेव्हा तिच्या कंपनीने घरून काम करण्याचा पर्याय दिला. रोजाने याचा उपयोग मोठी संधी म्हणून केला.
रोजा सांगते की, तिचे भाऊ आणि वडील नुकसानीमुळे शेती सोडणार होते. तिने शेतीचं आव्हान स्वीकारलं. त्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला. नोकरीची वेळ संपल्यानंतर ती संध्याकाळी चार वाजल्यापासून शेतात काम करू लागली. उत्पादनात घट होण्याचे कारण तिने शोधून काढले. रसायनाचा अतिवापर हे त्याचे कारण होते. रोजाने ठरवले की ती सेंद्रिय पद्धतीने शेतीची सुपीकता पुनर्संचयित करेल. कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध मुलीने सेंद्रिय शेती सुरू केली. रोजाने आपली नियमित नोकरी सोडू नये अशी कुटुंबाची इच्छा होती.
सेंद्रिय शेतीमुळे शेतीचे उत्पन्न वाढू शकते यावर बहुतांश गावकऱ्यांचा आणि रोजाच्या कुटुंबाचा विश्वास नव्हता. रोजा सांगते की नातेवाईक, गावकरी आणि कुटुंबीयांनी तिची खिल्ली उडवली. नोकरी सोडली आणि शेतकरी बनली. रोजा यांनी शेतात 40 प्रकारच्या भाज्या पिकवण्यास सुरुवात केली. यामध्ये वांगी आणि सिमला मिरचीचा समावेश होता. तिने विविध तालुक्यांमध्ये सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे गट तयार करण्यास सुरुवात केली. सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती करणे हा यामागचा उद्देश होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.