मोदींचे मिशन सरकारी नोकरी! 71000 तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप; पंतप्रधान म्हणाले,"तरुण सर्वात मोठी ताकद"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 12:42 PM2022-11-22T12:42:41+5:302022-11-22T12:43:18+5:30

rojgar mela : गेल्या महिन्यात याच दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशीच 75 हजार नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले होते. 

rojgar mela pm narendra modi 10 lakh govt jobs in bank ssc nursing teacher bsf cisf  | मोदींचे मिशन सरकारी नोकरी! 71000 तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप; पंतप्रधान म्हणाले,"तरुण सर्वात मोठी ताकद"

मोदींचे मिशन सरकारी नोकरी! 71000 तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप; पंतप्रधान म्हणाले,"तरुण सर्वात मोठी ताकद"

googlenewsNext

नवी दिल्ली : 10 लाख तरुणांना सरकारी नोकरी (Sarkari Naukri) देण्यासाठी सुरु झालेल्या रोजगार मेळाव्याचे (Rojgar Mela) आयोजन करण्यात आले. यावेळी आजच्या रोजगार मेळाव्यातून हे दिसून येते की सरकारी नोकऱ्या देण्यासाठी सरकार मिशन मोडमध्ये कसे काम करत आहे. रोजगार मेळाव्याशी संबंधित सर्व तरुणांचे अभिनंदन, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. दरम्यान, आज 71 हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. गेल्या महिन्यात याच दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशीच 75 हजार नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले होते. 

या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,  केंद्र सरकार सरकारी नोकऱ्यांमध्ये रोजगार देण्यासाठी मिशन मोडवर काम करत आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांसह अनेक भाजपशासित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनीही असेच प्रयत्न केले आहेत. 28 नोव्हेंबर रोजी गोवा आणि त्रिपुरामध्ये अशाच प्रकारचा रोजगार मेळावा आयोजित केला जाईल. डबल इंजिन सरकार असण्याचा हा फायदा आहे.

देशाने अमृत काळात प्रवेश केला आहे, आम्ही भारताचा विकास करण्याचे वचन घेतले आहे. या वचनामध्ये तुम्ही सर्वजण सारथी बनणार आहात. सर्व निवडक तरुणांसाठी 'कर्मयोगी प्रारंभ' हा विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, उपस्थित जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत हे जगाचे उत्पादन केंद्र बनणार आहे. आमच्या सरकारने अंतराळ क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण करण्याची संधी दिली आहे, ज्यामध्ये ड्रोनद्वारे नोकऱ्यांचा समावेश आहे. देशातील तरुणांनी नव्या संधींचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 



 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतासारख्या तरुण देशात आमचे करोडो युवक या देशाची सर्वात मोठी ताकद आहेत. आपल्या तरुणांची प्रतिभा आणि उर्जा राष्ट्र उभारणीत वापरली जावी, ही केंद्र सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. तसेच, सरकारने 'कर्मयोगी भारत' नावाचे तंत्रज्ञान मंच सुरू केले आहे. या प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारे ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन कोर्सेसचा त्यांनी जरूर लाभ घ्यावा. यामुळे कौशल्य तर वाढेलच, शिवाय भविष्यातील करिअरमध्येही खूप फायदा होईल, असे त्यांनी तरुणांना सांगितले. याशिवाय, आज भारत सेवा निर्यातीच्या बाबतीत जगातील एक मोठी शक्ती बनला आहे. लवकरच भारत उत्पादनाचे केंद्र बनेल, असा विश्वास तज्ज्ञांना आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

Web Title: rojgar mela pm narendra modi 10 lakh govt jobs in bank ssc nursing teacher bsf cisf 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.