रालोद की मूंछ, या भाजपा की पूंछ!

By admin | Published: February 17, 2017 12:49 AM2017-02-17T00:49:28+5:302017-02-17T00:49:28+5:30

‘रालोद की मूंछ बनोगे... या भाजपा की पूंछ बनोगे?’ हे घोषणा आहे, अजितसिंग यांच्या राष्ट्रीय लोकदल पक्षाची. जाट मतदारांचा प्रभाव

Roland's mustache, or BJP's tail! | रालोद की मूंछ, या भाजपा की पूंछ!

रालोद की मूंछ, या भाजपा की पूंछ!

Next

सुरेश भटेवरा / हरदोई
‘रालोद की मूंछ बनोगे... या भाजपा की पूंछ बनोगे?’ हे घोषणा आहे, अजितसिंग यांच्या राष्ट्रीय लोकदल पक्षाची. जाट मतदारांचा प्रभाव असलेले अनेक मतदारसंघ पश्चिमी उत्तर प्रदेशात आहेत मात्र समाजवादी आणि काँग्रेसच्या आघाडीत शिरण्याची संधी न मिळाल्यामुळे अजितसिंगांनी राज्यभरात ३00 हून अधिक उमेदवार उभे केले आहेत.
लोकसभा निवडणुकीत बहुतांश जाट समाज मोदींच्या पाठिशी उभा राहिला. त्याचा फायदा झाला. आता जाटांनी भाजपाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. जाटांचे नेते यशपाल मलिक म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदी आणि भाजपाने विश्वासघात केला. लोकसभेवेळी दिलेले आरक्षणापासून मुजफ्फरपूर दंगलीतल्या दोषींना शिक्षा करण्यापर्यंतचे एकही आश्वासन पूर्ण केले नाही. हरयाणा हेही जाटांची बहुसंख्या असलेले राज्य. तिथेही जाट नेत्याला मुख्यमंत्री केले नाही.
निवडणुकीच्या तोंडावर जाट महासभेने भाजपाला जाब विचारण्यास रॅलीचे आयोजन केले, तेव्हा पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह सारेच नेते जागे झाले. पण जाटांची समजूत घालण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना यश आले नाही. भाजपाकडून मुखभंग झाल्यामुळे जाट अस्मितेचे अंगार प्रज्वलित झालेत. भाजपाने कैरानातील हिंदुंचे पलायन आणि लव्ह जिहादसारखे मुद्दे तापवले. मात्र त्यातली हवा निघून गेली आहे. मुजफ्फरपूरच्या दंगलीची धग मात्र कायम असल्याने मुस्लीम हितरक्षणाचा झेंडा फडकावणाऱ्या समाजवादी पक्षालाही जाट जवळ करणार नाहीत. मग ही मते कोणाला मिळणार? जाट मतदानाचा आजवरचा पॅटर्न लक्षात घेता ते एकदा अजितसिंगांना मतदान करतात आणि पुढल्या निवडणुकीत रालोदला अंगठा दाखवतात. आता अजितसिंगांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दंगलीचा आरोप असलेले भाजपा आमदार संगीत सोम व सुरेश राणा यांच्या विरोधात रालोदने मुस्लीम तर सपाने जाट उमेदवार उतरवल्याने ते अडचणीत आहेत.

Web Title: Roland's mustache, or BJP's tail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.