मालेगाव प्रकरणी केंद्राची भूमिका ‘गो स्लो’ नाही

By admin | Published: June 27, 2015 02:09 AM2015-06-27T02:09:00+5:302015-06-27T02:09:00+5:30

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी केंद्र सरकारची भूमिका ‘गो स्लो’ अशी आहे, अशा प्रकारचा जो आरोप होत आहे त्यात तथ्य नाही,

The role of the Center in Malegaon case is not 'go slow' | मालेगाव प्रकरणी केंद्राची भूमिका ‘गो स्लो’ नाही

मालेगाव प्रकरणी केंद्राची भूमिका ‘गो स्लो’ नाही

Next

पणजी : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी केंद्र सरकारची भूमिका ‘गो स्लो’ अशी आहे, अशा प्रकारचा जो आरोप होत आहे त्यात तथ्य नाही, असे केंद्रीय संसदीय व्यवहार राज्यमंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी येथे शुक्रवारी स्पष्ट केले.
नक्वी गोवा भेटीवर आले असून, त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी केंद्राची भूमिका मालेगाव तपास प्रकरणी ‘गो स्लो’ अशी आहे, असे आपल्याला सांगण्यात आले आल्याचे वादग्रस्त विधान विशेष सरकारी वकील रोहिणी सालीयन यांनी केले होते.
त्यावर नक्वी यांनी भूमिका स्पष्ट केली़ आपण कोणावर आरोप करीत नाही, पण उगाच वारंवार केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करण्याचे जे षड्यंत्र सुरू आहे, त्याचाच हा भाग असल्याचे ते म्हणाले़
मालेगावप्रकरणी तपासकाम निश्चितच व्यवस्थित होईल. कायद्यानुसार प्रक्रिया होईल, पण उगाच निर्दोष व्यक्तींना शिक्षा होणार नाही़ आरोपींची गय केली जाणार नाही, असे नक्वी यांनी स्पष्ट केले. (खास प्रतिनिधी)

Web Title: The role of the Center in Malegaon case is not 'go slow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.