सीपीईसीविषयी भारताशी चर्चा करण्याची तयारी, चीनची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 02:12 AM2018-01-30T02:12:55+5:302018-01-30T02:13:07+5:30
पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाºया, तसेच ५० अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित असलेल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी)बाबत भारताशी असलेले मतभेद संपविण्यासाठी त्या देशाशी चर्चा करण्यास तयार असल्याचे चीनने म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीरवर भारत सतत हक्क सांगत असून, त्या वादग्रस्त भागातून हा प्रकल्प जात असल्याबद्दल भारताने चीनकडे नाराजी व्यक्त केली आहे.
बिजींग : पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाºया, तसेच ५० अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित असलेल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी)बाबत भारताशी असलेले मतभेद संपविण्यासाठी त्या देशाशी चर्चा करण्यास तयार असल्याचे चीनने म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीरवर भारत सतत हक्क सांगत असून, त्या वादग्रस्त भागातून हा प्रकल्प जात असल्याबद्दल भारताने चीनकडे नाराजी व्यक्त केली आहे.
सीपीईसीसंदर्भात असलेल्या मतभेदांकडे कानाडोळा करण्यात येऊ नये, असे मत भारताचे चीनमधील राजदूत गौतम बंबवाले यांनी चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सांगितले की, सीपीईसीसंदर्भातील मतभेदांबाबत चीन भारताशी चर्चा करण्यास तयार आहे. या मतभेदांचा दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.
सीपीईसी हा आर्थिक सहकार्याशी निगडित प्रकल्प आहे. चीन व पाकिस्तान दरम्यानचा हा प्रकल्प राबविताना तिसºया देशाला लक्ष्य करण्याचा आमचा उद्देश नाही. ही बाजू भारताने लक्षात घेतली पाहिजे. भारतासोबतचे संबंध
आणखी दृढ व्हावे, म्हणून चीन प्रयत्नशील आहे. (वृत्तसंस्था)
भारताला शह देण्याचा प्रयत्न?
चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी) या प्रकल्पा दरम्यान अनेक पायाभूत सुविधांची बांधकामे केली जात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील गद्वार बंदराचा भाग हा रस्तेवाहतुकीच्या माध्यमातून थेट चीनच्या झिनजियांग प्रांताशी जोडला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीन व पाकिस्तान भारताला शह देऊ पाहात आहे, असाही मतप्रवाह आहे.