आरोग्य सेवेकडे बघण्याची भूमिका सर्वंकष- पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 01:13 AM2021-02-24T01:13:43+5:302021-02-24T01:13:50+5:30
नवी दिल्ली : आमच्या सरकारची देशातील आरोग्यसेवेकडे बघण्याची भूमिका ही फक्त उपचारांपुरती नसून शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडेही सर्वंकष लक्ष ...
नवी दिल्ली : आमच्या सरकारची देशातील आरोग्यसेवेकडे बघण्याची भूमिका ही फक्त उपचारांपुरती नसून शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडेही सर्वंकष लक्ष देणारी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हटले. आरोग्य क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींच्या परिणामकारक अमलबजावणीवरील वेबिनारमध्ये बोलताना मोदी म्हणाले, “आरोग्यासाठी जी आर्थिक तरतूद केली गेली आहे ती लक्षणीय असून, या क्षेत्राबद्दल सरकारची बांधिलकी त्यातून दिसते.
आरोग्यक्षेत्र सहजपणे उपलब्ध होऊन ते परवडणारे असण्याची ही वेळ असून, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.” भारताला सुदृढ ठेवण्यासाठी सरकार एकाच वेळी चार आघाड्यांवर म्हणजे आजाराला प्रतिबंध, शारीरिक व मानसिक आरोग्य जपणे, आरोग्य सेवा सगळ्यांना उपलब्ध होणे, आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा दर्जा व प्रमाण आणि ती सेवा देणाऱ्यांची संख्या वाढवण्याचे काम करीत आहे. हे काम अभियान स्वरुपात केले जात असल्याचे मोदी म्हणाले.