चिकन खाल्ल्यामुळे अभिनेत्याने नाकारली महादेवाची भूमिका
By admin | Published: February 26, 2017 12:15 PM2017-02-26T12:15:16+5:302017-02-26T12:15:16+5:30
चित्रीकरणाच्या दिवशी चिकन खाल्लं असल्यामुळे भगवान शंकराची भूमिका साकारण्यास नकार दिला
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - रिएलिटी शो 'बिग बॉस', 'रोडीज' आणि 'स्प्लिट्सव्हिला' यामधून चर्चेत आलेला अभिनेता प्रिन्स नरूला याने भगवान शंकराची भूमिका करण्यास नकार दिला आहे.
टीव्ही शो 'बढ़ो बहू' मध्ये प्रिन्स लकी या भूमिकेत दिसतोय. या कार्यक्रमातील एका भागासाठी भगवान शंकराची भूमिका करण्यास प्रिन्सला सांगण्यात आलं. मात्र, त्यादिवशी चिकन खाल्लं असल्यामुळे त्याने ती भूमिका साकारण्यास नकार दिला.
न्यूज एजेन्सी आयएएनएसनुसार प्रिन्स म्हणाला, ''कमी वेळ शिल्लक असताना स्क्रिप्ट देऊऩ मला भगवान शंकराची भूमिका साकरण्यास सांगितलं गेलं. ज्यादिवशी मी मांसाहार करतो त्या दिवशी मी कोणत्याही देवाची भूमिका करू शकत नाही. जेव्हा मला देवाची भूमिका साकारायची असते त्या दिवशी मी मांसाहार करत नाही''. कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी आणि चॅनलने त्याच्या भावना समजून घेतल्या आणि भूमिकेसाठी बळजबरी केली नाही त्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला.
प्रिन्स नरूला बिग बॉसच्या 9 व्या सत्राचा विजेता होता.