आयुक्तांशी चर्चेनंतरच घेणार जलतरण तलाव ताब्यात अधिकार्‍यांची भूमिका : स्थायीत दिले होते आदेश

By Admin | Published: November 10, 2015 08:21 PM2015-11-10T20:21:20+5:302015-11-10T20:21:20+5:30

जळगाव : मनपाचा कोकीळ गुरुजी जलतरण तलाव मक्तेदाराने बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हा तलाव ताब्यात घेण्याची सूचना स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली होती. याबाबत मक्तेदारासोबत बांधकाम विभागाची बैठकही झाली आहे. मात्र आयुक्तांशी चर्चेनंतरच हा जलतरण तलाव ताब्यात घेतला जाणार आहे.

The role of the officials in the possession of the Swimming Pool, which will be held after the discussion with the Commissioner: Order given in place | आयुक्तांशी चर्चेनंतरच घेणार जलतरण तलाव ताब्यात अधिकार्‍यांची भूमिका : स्थायीत दिले होते आदेश

आयुक्तांशी चर्चेनंतरच घेणार जलतरण तलाव ताब्यात अधिकार्‍यांची भूमिका : स्थायीत दिले होते आदेश

googlenewsNext
गाव : मनपाचा कोकीळ गुरुजी जलतरण तलाव मक्तेदाराने बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हा तलाव ताब्यात घेण्याची सूचना स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली होती. याबाबत मक्तेदारासोबत बांधकाम विभागाची बैठकही झाली आहे. मात्र आयुक्तांशी चर्चेनंतरच हा जलतरण तलाव ताब्यात घेतला जाणार आहे.
मनपाने मक्तेदाराला जलतरण तलाव चालविण्यासाठी दिला होता. मात्र जादा रकमेचे दुरुस्तीकाम मनपाने करावे, असे ठरलेले असतानाही मनपाकडून ते केले जात नसल्याने मक्तेदाराने जलतरण तलावाला कुलूप ठोकले आहे. या चाव्या अधिकार्‍यांना देण्यासाठी आणल्या मात्र विधी विभागाचे मत घेऊनच पुढील कार्यवाही करू, असे मनपातर्फे सांगण्यात आले होते. दरम्यान जलतरण तलाव बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून नेहमी पोहण्यासाठी येणार्‍या नागरिकांनी किरकोळ दुरुस्तीचे काम वर्गणी करून करण्याची तयारी दर्शविली. परंतु मनपाने तलाव सुरू करावा अशी मागणी केली आहे. त्यानुसार स्थायी समितीच्या सभेत यावर चर्चा होऊन आधी तलाव मनपाने ताब्यात घ्यावा. तसेच नवीन मक्ता देईपर्यंत तलाव मनपाने चालवावा, असे ठरले. त्यानुसार त्याच दिवशी मनपाच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी मक्तेदाराशी चर्चा केली. मात्र मनपा आयुक्त सभेला नव्हते. त्यामुळे आयुक्तांशी चर्चा करूनच तलाव ताब्यात घेण्यात येईल, असे बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
-----
मक्तेदाराकडून बदल
तलावात मक्तेदाराने सोयीसाठी काही बदल केले होते. मनपाच्या ताब्यात जलतरण तलाव देण्यापूर्वी तलाव पुन्हा पूर्वीप्रमाणे करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: The role of the officials in the possession of the Swimming Pool, which will be held after the discussion with the Commissioner: Order given in place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.