सवार्ेच्च न्यायालयाचा आदेश डावलत भरतोय बाजार मनपाची बघ्याची भूमिका: आमदारांच्या पाठबळामुळे हॉकर्सची वाढली हिंमत

By admin | Published: August 15, 2016 12:51 AM2016-08-15T00:51:07+5:302016-08-15T00:51:07+5:30

जळगाव: मनपाने बळीरामपेठेतील हॉकर्सचे गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतर करण्याचा घेतलेला निर्णय सवार्ेच्च न्यायालयाकडूनही वैध ठरविण्यात आलेला असतानाही हा आदेश डावलत हॉकर्सकडून बळीरामपेठेतच बाजार भरविला जात आहे. आमदार सुरेश भोळे यांचे पाठबळ या हॉकर्सला मिळत असल्याने त्यांनी तसेच सुभाष चौक रस्त्यावरील हॉकर्सनेही पुन्हा रस्त्यावर बाजार मांडला आहे. तर मनपा मात्र पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण दाखवित बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.

The role of the Supreme Court is to fulfill the mandate of the Municipal Corporation: the increased courage of the Hawkers due to the support of the legislators. | सवार्ेच्च न्यायालयाचा आदेश डावलत भरतोय बाजार मनपाची बघ्याची भूमिका: आमदारांच्या पाठबळामुळे हॉकर्सची वाढली हिंमत

सवार्ेच्च न्यायालयाचा आदेश डावलत भरतोय बाजार मनपाची बघ्याची भूमिका: आमदारांच्या पाठबळामुळे हॉकर्सची वाढली हिंमत

Next
गाव: मनपाने बळीरामपेठेतील हॉकर्सचे गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतर करण्याचा घेतलेला निर्णय सवार्ेच्च न्यायालयाकडूनही वैध ठरविण्यात आलेला असतानाही हा आदेश डावलत हॉकर्सकडून बळीरामपेठेतच बाजार भरविला जात आहे. आमदार सुरेश भोळे यांचे पाठबळ या हॉकर्सला मिळत असल्याने त्यांनी तसेच सुभाष चौक रस्त्यावरील हॉकर्सनेही पुन्हा रस्त्यावर बाजार मांडला आहे. तर मनपा मात्र पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण दाखवित बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.
मनपाने सवार्ेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन रस्ता सुरक्षा समितीच्या आदेशानुसारच शहरातील प्रमुख वर्दळीचे रस्ते मोकळे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ११ रस्त्यांवरील अतिक्रमण हटविले जात आहे. त्यानुसार बळीरामपेठेतील हॉकर्सचे गोलाणी मार्केटच्या ओट्यांवर स्थलांतर केले जाणार आहे. मात्र हॉ़कर्सने त्यास विरोध दर्शविला. मात्र जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने व त्यानंतर सवार्ेच्च न्यायालयाने देखील हॉकर्सची याचिका फेटाळत मनपाची कारवाई योग्य ठरविली आहे. असे असतानाही हॉकर्सकडून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत रस्त्यावरच व्यवसाय केला जात आहे. रविवारी देखील बळीरामपेठ तसेच सुभाष चौकातील रस्त्यावर हॉकर्सने अतिक्रमण केले होते.

Web Title: The role of the Supreme Court is to fulfill the mandate of the Municipal Corporation: the increased courage of the Hawkers due to the support of the legislators.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.