भारीच! 22 व्या वर्षी झाला IAS अन् वर्षभरात सोडली नोकरी; आता कोट्यवधींच्या कंपनीचा मालक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 15:02 IST2023-02-11T14:56:34+5:302023-02-11T15:02:44+5:30
रोमन सैनी हे एक डॉक्टर, माजी IAS अधिकारी आणि एक अतिशय यशस्वी बिझनेसमन आहेत

भारीच! 22 व्या वर्षी झाला IAS अन् वर्षभरात सोडली नोकरी; आता कोट्यवधींच्या कंपनीचा मालक
भारतातील लाखो विद्यार्थ्यांसाठी, आयएएस अधिकारी किंवा डॉक्टर होणं हे एक स्वप्न आहे. काहीजण कठोर परिश्रमाने हे स्वप्न सत्यात उतरवतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. रोमन सैनी हे एक डॉक्टर, माजी IAS अधिकारी आणि एक अतिशय यशस्वी बिझनेसमन आहेत. वयाच्या 16 व्या वर्षी रोमन सैनी यांनी एम्स प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली होती. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी एका प्रतिष्ठित मेडिकल पब्लिकेशनमध्ये एक रिसर्च पेपर लिहिला होता.
एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर, रोमन सैनी यांनी एम्समधील नॅशनल ड्रग डिपेंडन्स ट्रीटमेंट सेंटर (NDDTC) येथे काम केले. बहुतेक लोकांना अशी प्रतिष्ठित नोकरी आवडेल परंतु रोमन यांच्यासाठी, डॉक्टर म्हणून त्यांचा कार्यकाळ फक्त 6 महिने टिकला. ते आता आयएएस अधिकारी होण्याच्या मार्गावर होते. वयाच्या 22 व्या वर्षी, रोमन सैनी यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली, जी भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे.
रोमन वयाच्या 22 व्या वर्षी सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक होते आणि मध्य प्रदेशमध्ये जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले होते. आयएएस अधिकारी म्हणून त्यांचा कार्यकाळ कमीच असणार होता. त्यांनी लवकरच प्रतिष्ठित नोकरी सोडली आणि त्याऐवजी त्याचा मित्र गौरव मुंजाल याच्यासोबत युनाकॅडमीची स्थापना केली, हे व्यासपीठ आज हजारो IAS इच्छुकांना UPSC परीक्षेची तयारी करण्यास मदत करते.
Unacademy ची कल्पना UPSC कोचिंग क्लासेससाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची होती, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही. Unacademy 2010 मध्ये गौरव मुंजाल यांनी तयार केलेले YouTube चॅनेल म्हणून सुरू झाले, कंपनीची अधिकृतपणे मुंजाल, सैनी आणि त्यांचे तिसरे सह-संस्थापक हेमेश सिंह यांनी 2015 मध्ये स्थापना केली होती. सहा वर्षांनंतर, Unacademy हे 18,000 शिक्षकांचे नेटवर्क असलेले भारतातील सर्वात मोठे शैक्षणिक तंत्रज्ञान व्यासपीठ आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"