सुसाट दुचाकीवर रोमान्स, अश्लिल चाळे करत शूट केलं रील, तरुण-तरुणीने ओलांडली हद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 15:35 IST2025-01-11T15:34:34+5:302025-01-11T15:35:26+5:30
Social Viral News: सोशल मीडियाचा सुळसुळाट झाल्यापासून त्यावर चित्रविचित्र रील्स शेअर करून चर्चेत राहणाऱ्यांचं प्रमाणही वाढलं आहे. आपले व्हिडीओ व्हायरल व्हावेत यासाशी अशी मंडळी अनेकदा सर्व मर्यादा ओलांडताना दिसतात. असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील कानपूर येथून समोर आला आहे.

सुसाट दुचाकीवर रोमान्स, अश्लिल चाळे करत शूट केलं रील, तरुण-तरुणीने ओलांडली हद्द
सोशल मीडियाचा सुळसुळाट झाल्यापासून त्यावर चित्रविचित्र रील्स शेअर करून चर्चेत राहणाऱ्यांचं प्रमाणही वाढलं आहे. आपले व्हिडीओ व्हायरल व्हावेत यासाशी अशी मंडळी अनेकदा सर्व मर्यादा ओलांडताना दिसतात. असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील कानपूर येथून समोर आला आहे. येथे एका जोडप्याने धावत्या दुचाकीवर रोमान्स करत व्हिडीओ तयार केला, हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण हेल्मेट न घालता दुचाकी चालवताना दिसत आहे. तर तरुणी दुचाकीच्या टाकीवर बसून तरुणासोबत चाळे करताना दिसत आहे. हा व्हिडीओ कानपूरमधील गंगा बॅराज येथे चित्रित करण्यात आल्याचं सांगण्यात येत असून, या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कानपूरमध्ये व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ गंगा बॅराजजवळील बिठूर रोड येथे बनवण्यात आला आला असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण हेल्मेट परिधान न करता भरधाव वेगाने दुचाकी चालवताना दिसत आहे. तर त्याच्यासोबत असलेली तरुणी दुचाकीच्या टाकीवर बसून तरुणाच्या गळ्यात हात घालून अश्लिल चाळे करत आहेत. तसेच या जोडप्याने अगदी धोकादायक पद्धतीने रील चित्रित करून ते शेअर केल्याचेही समोर आले आहे.
सुमारे ३२ सेकंदांचा हा व्हिडीओ कधी तरास करण्यात आला याची माहिती मिळू शकलेली नाही. या प्रकरणी अधिक माहिती देताना कानपूर मध्यचे डीसीपी दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले की, हा व्हिडीओ जेथे चित्रित करण्यात आला तो भाग नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. त्यामुळे व्हायरल व्हिडीओच्या आधारावर नवाबगंज पोलिसांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या रील्समध्ये दुचाकी चालवत असलेला तरुण कल्याणपूरमधील रहिवासी असून, त्याच्या दुचाकीवर आतापर्यंत दहा वेळा दंडात्मक कारवाई झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या दुचाकीचा विमासुद्धा २०२३ मध्ये संपुष्टात आलेला आहे. तर तरुणासोबत दिसत असलेली तरुणी कुठली आहे, यापाबबतची माहिती समोर आलेली नाही.