Govt Scheme: २५ वर्ष वीज अगदी मोफत...बिनधास्त वापरा टीव्ही, फ्रीज; सरकारच्या 'या' स्क्रीमचा घ्या फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 12:57 PM2022-11-26T12:57:42+5:302022-11-26T12:58:42+5:30

महागाईनं लोकांचं बजेट बिघडलं आहे. दैनंदिन जीवनाशी निगडीत वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालं आहे.

rooftop solar subsidy know the apply process and how you can get benefits | Govt Scheme: २५ वर्ष वीज अगदी मोफत...बिनधास्त वापरा टीव्ही, फ्रीज; सरकारच्या 'या' स्क्रीमचा घ्या फायदा!

Govt Scheme: २५ वर्ष वीज अगदी मोफत...बिनधास्त वापरा टीव्ही, फ्रीज; सरकारच्या 'या' स्क्रीमचा घ्या फायदा!

googlenewsNext

नवी दिल्ली-

महागाईनं लोकांचं बजेट बिघडलं आहे. दैनंदिन जीवनाशी निगडीत वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालं आहे. पण तुमची इच्छा असेल तर एक जबरदस्त पद्धत वापरुन तुम्ही तुमचा महिन्याचा खर्च कमी करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला एकदाच थोडासा खर्च करावा लागेल. पण यात तुम्हाला सरकारही मदत करेल. तुम्हाला फक्त तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवावा लागेल. सोलर प्लेट वापरुन तुमच्या भरमसाट वीजबिलापासून मुक्ती प्राप्त करू शकता. 

सरकार देतंय सबसिडी
घराच्या छतावर अगदी सोप्या पद्धतीनं सोलर पॅनल लावून तुम्ही वीज निर्मिती करू शकता. यासाठी सरकार देखील तुम्हाला मदत करतं. सरकार सोलर एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी देतं. तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनला लावू इच्छित असाल तर सरकार तुम्हाला सबसिडी देईल. पण त्याआधी तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला नेमकी किती वीजेची गरज आहे. यातून तुम्हाला कल्पना येईल की नेमकं किती क्षमतेचा सोलर पॅनलची गरज आहे. 

तुमच्या घरात जर २-३ पंखे, एक फ्रीज, ६-८ LED लाइट्स, एक पाण्याची मोटर आणि टेलिव्हिजन या गोष्टी असतील तर तुम्हाला दररोज ६-८ युनिट वीजेची गरज आहे. यासाठी तुम्हाला २ किलोवॅट सोलर पॅनलची गरज आहे. मोनोपार्क बायफिशिअल सोलर पॅनल सध्या नव्या टेक्नोलॉजीचा सोलर पॅनल आहे. यात पुढे आणि मागे दोन्ही बाजूनं पावर जनरेट होते. यासाठी चार सोलर पॅनल २ किलोवॅटसाठी पुरेसे आहेत. 

किती मिळते सबसिडी?
भारतात सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ऊर्जामंत्रालयानं सोलर रुफटॉप योजना सुरू केली आहे. तुम्ही डिस्कॉम पॅनलमध्ये सदस्य असलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून आपल्या घरावर सोलर पॅनल बसवू शकता. त्यानंतर सबसिडीसाठी अर्ज करू शकता. तुम्ही जर ३ किलोवॅटपर्यंत सोलर पॅनल बसवत असाल तर सरकारकडून तुम्हाला ४० टक्के सबसिडी मिळेल. १० किलोवॅट सोलर पॅनलसाठी २० टक्क्यांपर्यंतची सबसिडी दिली जाते. 

खर्च किती?
२ किलोवॅट क्षमतेचं सोलर पॅनल बसवायचं झालं तर याचा खर्च जवळपास १.२० लाख रुपये इतका येतो. पण सरकार त्यावर ४० टक्के सबसिडी देतं. त्यानुसार तुम्हाला फक्त ७२ हजार रुपये खर्च करावे लागतील. तर सरकारकडून ४८ हजार रुपयांची सबसिडी प्राप्त करता येईल. सोलर पॅनलची लाइफ २५ वर्षांची असते. त्यामुळे एकदा तुम्ही सोलर पॅनल बसवला की पुढील २५ वर्ष तुम्हाला नो टेन्शन.

Web Title: rooftop solar subsidy know the apply process and how you can get benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज