विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राऊंड टेबल कटिबद्ध पराग शहा : राऊंड टेबलच्या अध्यक्षपदी आशिद पंचमिया
By admin | Published: August 14, 2015 12:32 AM2015-08-14T00:32:58+5:302015-08-14T00:32:58+5:30
सोलापूर :
Next
स लापूर : सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबलच्या माध्यमातून कुंभारीच्या विडी घरकूलमधील शाळेचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्याचा लाभ कर्मचारी वर्गातील अडीच हजार विद्यार्थ्यांना मिळत आहे. सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राऊंड टेबल कटिबद्ध असल्याची माहिती मावळते अध्यक्ष पराग शहा यांनी दिली. यावेळी नूतन अध्यक्षपदी आशिद पंचमिया यांची निवड करण्यात आली. गोवा येथे झालेल्या सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबलच्या वार्षिक सभेत पराग शहा बोलत होते. यावेळी राऊंड टेबलच्या नूतन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली़ ते पुढीलप्रमाणे अध्यक्षपदी आशिद पंचमिया, सचिव-रोहन शालगर, उपाध्यक्ष-स्वप्निल मर्दा, खजिनदार-कपिल जाजू यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. बैठकीस विष्णू राठी, पराग डाळे, अनुप मालपाणी, निखिल सुराणा, वासुदेव बंग, गिरीश मुंदडा आदी उपस्थित होते. यावेळी मावळते अध्यक्ष पराग शहा यांनी अध्यक्षपदाची सूत्रे आशिद पंचमिया यांना सुपूर्द केली. यावेळी पराग शहा म्हणाले की, सोलापुरात मोठ्या प्रमाणात विडी उद्योगात कर्मचारी वर्ग काम करीत आहे. या कर्मचार्यांच्या मुलांसाठी उत्तम शिक्षण एक परिपूर्ण वास्तूमध्ये मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी कंुभारी येथील गोदुताई परूळेकर विडी घरकूल परिसरात शाळेची इमारत बांधण्यात आली. या मुलांच्या भविष्यासाठी सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबलचे कार्य जोमाने सुरू आहे. राऊंड टेबलच्या देशव्यापी शैक्षणिक कार्यामुळे भारताचे शिक्षणातून स्वातंत्र्याचे लक्ष्य पूर्ण होत आहे. देशभरातील ८0 लाख शाळाबा मुलांपैकी किमान १0 लाख मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे नियोजन राऊंड टेबलचे आहे असे शहा यांनी सांगितले. सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबलच्या कार्याची गती अधिक होती तितक्याच ताकदीने पुढे जाईल. यामध्ये कुठेही फरक पडणार नाही. गरीब गरजू मुलांच्या शिक्षणासाठी अधिक परिश्रम घेईन, असे आश्वासन यावेळी नूतन अध्यक्ष आशिद पंचमिया यांनी दिले. (प्रतिनिधी)फोटो ओळ : सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबलच्या वार्षिक सभेत डावीकडून पराग शहा, स्वप्नाली मर्दा, हितेश केअरिंग, आशिद पंचमिया, रोहन शालगर पाठीमागे डावीकडून कपिल जाजू, अनूप मालपाणी, विष्णू राठी, पराग डाळे, निखिल सुराणा आदी. (फोटो नं.-१३ एच.आर.१३)