महिनाभरातच पुन्हा घेरले चौकास ! अहमदपुरातील समस्या : राजकीय हस्तक्षेपामुळे अतिक्रमणे पूर्ववत अहमदपूर : वाहतुकीची कोंडी फुटावी आणि वाहनचालकांसह पादचार्यांना ये- जा करताना
By Admin | Published: April 4, 2015 01:55 AM2015-04-04T01:55:10+5:302015-04-04T01:55:10+5:30
अहमदपूर हे जिल्ात तिसर्या क्रमांकाचे शहर आहे़ त्यामुळे विविध कामानिमित्ताने शहरात दररोज ये- जा करणार्यांची मोठी संख्या आहे़ परंतु, शहरातील बहुतांशी चौकांना अतिक्रमणांनी घेरले आहे़ शहरातील बसस्थानक व छत्रपती शिवाजी चौक ही महत्त्वाची ठिकाणे आहेत़ या दोन महत्त्वाच्या ठिकाणांसह अन्य चौक व प्रमुख रस्त्यांवर हातगाडे, भाजीविक्रेत्यांनी आपला व्यापारच मांडला आहे़ त्यामुळे हे रस्ते जणू या विक्रेत्यांसाठी बनविण्यात आले आहेत की काय असा अनेकदा प्रश्न निर्माण होत आहे़ परिणामी, वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे़
अ मदपूर हे जिल्ात तिसर्या क्रमांकाचे शहर आहे़ त्यामुळे विविध कामानिमित्ताने शहरात दररोज ये- जा करणार्यांची मोठी संख्या आहे़ परंतु, शहरातील बहुतांशी चौकांना अतिक्रमणांनी घेरले आहे़ शहरातील बसस्थानक व छत्रपती शिवाजी चौक ही महत्त्वाची ठिकाणे आहेत़ या दोन महत्त्वाच्या ठिकाणांसह अन्य चौक व प्रमुख रस्त्यांवर हातगाडे, भाजीविक्रेत्यांनी आपला व्यापारच मांडला आहे़ त्यामुळे हे रस्ते जणू या विक्रेत्यांसाठी बनविण्यात आले आहेत की काय असा अनेकदा प्रश्न निर्माण होत आहे़ परिणामी, वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे़शहरातील शासकीय विश्रामगृहापासून शिवाजी चौकापर्यंत संपूर्णपणे उतार आहे़ या ठिकाणी ऑटो, अवैध प्रवाशी वाहतूक करणारी वाहने थांबत आहेत़ तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषदेच्या जागेवरही या वाहनधारकांनी आपला ठिय्या मांडला आहे़ परिणामी, शहरात अपघताचे प्रमाण वाढले आहे़ गेल्या महिनाभरापूर्वी शहरातील स्वामी विवेकानंद मित्र मंडळ, पोलिस प्रशासन आणि नगर पालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली होती़ तसेच शिवाजी चौकातील अतिक्रमणेही काढण्यात आली़ परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे ही अतिक्रमण हटाव मोहीम अर्ध्यावरच राहिली़ परिणामी, महिनाभराच्या कालावधीत पुन्हा शहरातील सर्वच ठिकाणची अतिक्रमणे वाढली आहेत़ नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधींनी वाहतुकीची होणारी कोंडी दूर करण्यासाठी शहरातील अतिक्रमणे हटवावी, अशी मागणी सामान्यांतून होत आहे़तसेच सध्या शहरात सर्वाधिक वाहतुकीचे तीन केंद्र असून त्यात शिवाजी चौक, महात्मा बसवेश्वर चौक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आहेत़ या ठिकाणी सिग्नल उभारावेत, अशमी मागणी होत आहे़ अतिक्रमणधारक हातगाडीवाले आणि भाजीपाले विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देऊन सामान्यांची अडचण दूर करण्याची मागणी होत आहे़चौकट़़़लवकरच अतिक्रमणे काढणाऱ़़शहरातील शिवाजी चौकातील अतिक्रमणधारकांना नगर परिषदेने नोटीसा बजावल्या आहेत़ लवकरच ही अतिक्रमणे हटविण्यात येतील, असे नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी व्ही़ डी़ हराळे यांनी सांगितले़