उपद्रवी गोत्रावरून रण

By admin | Published: February 3, 2015 02:15 AM2015-02-03T02:15:03+5:302015-02-03T02:15:03+5:30

जाहिरातीत आम आदमी पार्टीचे(आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता, त्यांच्या गोत्राला ‘उपद्रवी’ संबोधले आहे़

Routine from riotous tribe | उपद्रवी गोत्रावरून रण

उपद्रवी गोत्रावरून रण

Next

भाजपची जाहिरात : हा तर माझ्या समुदायाचा अपमान -केजरीवाल
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपची आणखी एक जाहिरात वादग्रस्त ठरली आहे़ या जाहिरातीत आम आदमी पार्टीचे(आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता, त्यांच्या गोत्राला ‘उपद्रवी’ संबोधले आहे़ दरम्यान या जाहिरातीवर केजरीवाल यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून हा माझ्या संपूर्ण समुदायाचा अपमान असल्याचे म्हटले आहे़ आपने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे़
भाजपकडून सोमवारी वृत्तपत्रांत जाहिरात प्रकाशित झाली आहे़ यात अप्रत्यक्षपणे केजरीवाल यांना लक्ष्य करण्यात आले असून त्यांना ‘उपद्रवी’ गोत्राचे संबोधण्यात आले आहे़ जाहिरात प्रकाशित होताच, केजरीवाल यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला़ गेल्या काही दिवसांपासून भाजप आपल्या जाहिरातींमधून माझ्यावर वैयक्तिक हल्ले करीत आहे़ भाजपने मला आणि माझ्या मुलांना लक्ष्य केले़ पण मी शांत राहिलो़ कारण अण्णा म्हणतात की, कुणी तुमच्यावर वैयक्तिक हल्ले करीत असेल तर ते सहन करण्याची शक्ती तुमच्यात असू द्या़ पण आज भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्या़ भाजपने माझ्या अग्रवाल समुदायाला ‘उपद्रवी’ संबोधले़ यासाठी भाजपने माझ्या संपूर्ण समुदायाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली़
आपने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे़ आपचे राष्ट्रीय सरचिटणीस पंकज गुप्ता यांनी ही माहिती दिली़ काँग्रेसनेही यानिमित्ताने भाजपवर हल्ला चढवला आहे़ जाती व समुदायाच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याचे काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी म्हटले आहे़
भाजपकडून बचाव
आम आदमी पार्टीच्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजपने आपला बचाव केला आहे़ ‘आप’ला आपल्या कामाशिवाय अन्य सगळ्या गोष्टी अपमानास्पद वाटतात, असे भाजपा नेते नलिन कोहली म्हणाले़ आपच्या निवडणूक राजकारणाने अतिशय खालची पातळी गाठली आहे़, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

आदर्शवादाच्या गप्पा मागणाऱ्या केजरीवालांनी जाणीवपूर्वक जातीचे राजकारण पुढे केले आहे, असे भाजपा प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव म्हणाले़


कोट
भाजपा आणखी खालच्या पातळीवर गेला़ आता आपल्या जाहिरातीत भाजपाने केजरीवाल यांच्या गोत्राला लक्ष्य केले आहे़ या गोत्राचे लोक भाजपाला धडा शिकवणाऱ
- आशुतोष, आप नेते(टिष्ट्वटरवरील प्रतिक्रिया)

बॉक्स
भाजपाकडून बचाव
आम आदमी पार्टीच्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजपाने आपला बचाव केला आहे़‘आप’ला आपल्या कामाशिवाय अन्य सगळ्या गोष्टी अपमानास्पद वाटतात, असे भाजपा नेते नलिन कोहली म्हणाले़ आपच्या निवडणूक राजकारणाने अतिशय खालची पातळी गाठली आहे़ आदर्शवादाच्या गप्पा मागणाऱ्या केजरीवालांनी जाणीवपूर्वक जातीचे राजकारण पुढे केले आहे, असे भाजपा प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव म्हणाले़

याचिकेवर आज सुनावणी
भाजप आणि काँग्रेसकडून लाच घ्या; पण मत मात्र आम्हाला द्या, या आक्षेपार्ह विधानासाठी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या फौजदारी तक्रारीवर दिल्लीचे एक न्यायालय मंगळवारी सुनावणी करणार आहे़

४या जाहिरातीत टोपी आणि मफलर घातलेली एक व्यक्ती राजपथाच्या परेडमध्ये उभी असलेली दाखवण्यात आली आहे़ या व्यक्तीच्या हातात झाडूही दाखवला आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील प्रमुख पाहुणे बराक ओबामा यांनाही जाहिरातीत दाखवण्यात आले आहे़ ‘मेरी ना सुनी तो, २६ जनवरी का प्रोग्राम बिघाड दुंगा और एक साल बाद व्हीआयपी पास की गुहार लगाऊंगा’, असे या जाहिरातीत लिहिलेले आहे़ याशिवाय,‘हे आंदोलनकारी़.़देश के करोडों लोग गणतंत्र दिवस को राष्ट्रीय पर्व मानते आहे़ इस पर गर्व करते है और आपका उपद्रवी गोत्र इसमें भी व्यवधान डालने को तैयार था’ असेही यात म्हटले आहे़ यापूर्वी भाजपने अशीच एक वादग्रस्त जाहिरात प्रकाशित केली होती़ या जाहिरातीतील व्यंगचित्रात समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातलेला दाखवलेला होता़

बेदींवर हुकूमशाहीचा आरोप करणाऱ्याची लगेच ‘घरवापसी’
दिल्लीतील भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचे प्रचार सहायक नरेंद्र टंडन यांनी बेदींवर हुकूमशाही वागणुकीचा आरोप करीत सोमवारी पक्षाला रामराम ठोकला. यानिमित्ताने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील वाद चव्हाट्यावर आल्याने भाजपवर खजील होण्याची पाळी आली. परंतु नंतर मात्र त्यांनी आपला राजीनामा परत घेतला.

भाजपच्या शहर शाखेचे माजी सचिव असलेले टंडन हे दिल्ली कार्यकारिणीचे स्थायी आमंत्रित आहेत. बेदींसोबत काम करणे अत्यंत कठीण असल्याचे सांगून त्यांनी सकाळी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे आपला राजीनामा पाठविला होता. त्यांनी तो मंजूरही केला. परंतु नंतर मात्र भाजप सोडण्याचा आपला निर्णय भावनात्मक होता असे सांगून त्यांनी राजीनामा मागेही घेतला. तत्पूर्वी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने टंडन यांचा राजीनामा मंजूर केला असल्याचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी सांगितले.

 

Web Title: Routine from riotous tribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.