आर.आर. विद्यालयातील शिक्षक, कर्मचार्यांचा छळ
By admin | Published: September 10, 2016 12:49 AM2016-09-10T00:49:32+5:302016-09-10T00:49:32+5:30
जळगाव : इस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर.आर. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे संस्थाध्यक्ष अरविंद बंकटलाल लाठी यांच्याकडून होणार्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळले आहेत. अपमानास्पद वागणूक देऊन वेठीस धरणे, दादागिरी करणे, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, सेवेतून काढून टाकण्याच्या धमक्या देणे, असे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून लाठी यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप शिक्षक व कर्मचार्यांनी केला असून त्याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांना दिले आहे.
Next
ज गाव : इस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर.आर. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे संस्थाध्यक्ष अरविंद बंकटलाल लाठी यांच्याकडून होणार्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळले आहेत. अपमानास्पद वागणूक देऊन वेठीस धरणे, दादागिरी करणे, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, सेवेतून काढून टाकण्याच्या धमक्या देणे, असे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून लाठी यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप शिक्षक व कर्मचार्यांनी केला असून त्याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांना दिले आहे.यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, अरविंद लाठी हे २००१ मध्ये संस्थेत सचिव म्हणून आले. त्यानंतर ते अध्यक्ष झाले. तेव्हापासून त्यांनी संस्थेत दादागिरी व हुकूमशाही सुरू केली. हा प्रकार विद्यालयात आजतागायत सुरू आहे. संस्था नामांकित असल्याने संस्थेची बदनामी होऊ नये, म्हणून सर्वांनी या प्रकाराविषयी तक्रार करणे टाळले. परंतु लाठी यांच्याकडून होणारा त्रास सहनशक्ती पलीकडे गेल्याने शिक्षक व कर्मचार्यांनी शेवटी पोलीस अधीक्षकांकडे लेखी स्वरुपात तक्रार केली.कामात नाहक हस्तक्षेपशासनाकडून प्राप्त होणार्या शासकीय आदेशांचा चुकीचा अर्थ लावून संस्थाध्यक्ष लाठी हे मुख्याध्यापकांवर दबाव आणून शासनाविरोधात पत्रव्यवहार करण्यास भाग पाडतात. शिक्षकांच्या किरकोळ रजा, सहल यासारख्या मुख्याध्यापकांच्या अखत्यारितील बाबीतही ते हस्तक्षेप करतात. अशा वेळी एकाच दिवसात चार ते पाच मेमो देऊन शिक्षकांवर दबाव आणला जातो. खोट्या गुन्ात अडकवून निलंबित करण्याचीही धमकी देऊन दिली जाते. लाठी यांनी विद्यालयाचे सर्व आर्थिक व्यवहार त्यांच्या ताब्यात ठेवले आहेत. एकही बिल त्यांच्या संमतीशिवाय निघत नाही. मुख्याध्यापक नावालाच सा करत असल्याचा आरोप आहे.सेवाज्येष्ठता डावललीसंस्थेच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या तत्कालीन प्राचार्या प्रतिभा पाटील यांना आर.आर. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका करण्यासाठी इतर शिक्षकांची सेवाज्येष्ठता डावलून लाठी यांनी दबाव आणला. सर्वांकडून जबरदस्तीने लिहून घेत त्यांची दोन वर्षांसाठी नियमबा नेमणूक केली. शिक्षक व कर्मचार्यांकडून खासगी कामे करून घेणे, कारकुनांचा सतत मानसिक छळ करणे, जातीयवादाच्या भावनेतून मागासवर्गीय शिक्षकांना अपमानीत करणे, ड्रेसकोडची सक्ती करणे, असा त्रास त्यांच्याकडून सुरू आहे.वेतनवाढ रोखणे, निवडश्रेणी नाकारणेसेवानिवृत्त पर्यवेक्षक व्ही.ए. जावळे व उप मुख्याध्यापिका व्ही.के. काबरा यांची वेतनवाढ रोखली आहे. काही शिक्षकांनी २४ वर्ष सेवा करूनही त्यांना हेतुपुरस्सरपणे निवडश्रेणी नाकारण्यात आलीआहे.वैद्यकीयबिलांनाहीत्रुटींच्यानावाखालीउशीरकेलाजातो,असेनिवेदनातम्हटलेआहे.