रेल्वेच्या परीक्षेवरुन विद्यार्थी आक्रमक, आंदोलनाला हिंसक वळण; खान सरांसह 400 जणांवर FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 10:43 AM2022-01-27T10:43:54+5:302022-01-27T10:45:43+5:30

RRB NTPC Student Protest And Khan Sir : सोशल मीडियावर लोकप्रिय झालेले खान सर आणि इतर काही संस्थांबरोबरच एकूण 400 जणांविरोधात पाटणा पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.

rrb ntpc student protest case registered against patna khan sir | रेल्वेच्या परीक्षेवरुन विद्यार्थी आक्रमक, आंदोलनाला हिंसक वळण; खान सरांसह 400 जणांवर FIR दाखल

रेल्वेच्या परीक्षेवरुन विद्यार्थी आक्रमक, आंदोलनाला हिंसक वळण; खान सरांसह 400 जणांवर FIR दाखल

googlenewsNext

नवी दिल्ली - बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी रेल्वेच्या परीक्षेवरुन राज्यामध्ये गोंधळाची स्थिती दिसून आली. भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यानी अनेक ठिकाणी इंजिनला आग लावली, पोलिसांवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारच्या बक्सर, मुझफ्फरपूर, नालंदा, नवादा, सीतामढी आणि आरामध्ये विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅक जाम केला होता. विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीमध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर लोकप्रिय झालेले खान सर आणि इतर काही संस्थांबरोबरच एकूण 400 जणांविरोधात पाटणा पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. 

सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या हिंसेनंतर राज्याच्या राजधानीमधील पत्रकार नगर पोलीस स्थानकात अटकेत असणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांचा जबाब नोंदवण्यात आला. या जबाबाच्या आधारेच गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक करण्यात आलेले आंदोलक विद्यार्थी हे या परीक्षेला बसणार होते. या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून आपण हिंसा आणि जाळपोळ केल्याची कबुली दिलीय. या व्हिडीओमध्ये खान सर यांनी आरआरबी एनटीपीसी परीक्षा रद्द न केल्यास विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यासंदर्भात मोठं विधान केल्याचं सांगितलं जात आहे.

विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनाबद्दल खान सर यांनी बुधवारी एक पत्रक जारी करुन आपलं म्हणणं मांडलं आहे. आरआरबीने जो काही निर्णय घेतलाय तो 18 तारखेलाच घेण्यात आला असता तर सध्या जी परिस्थिती निर्माण झाली ती झाली नसती. आज आरआरबीने योग्य निर्णय घेत 16 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांचे सल्ले त्यांनी मागवल्याचं खान सर यांनी म्हटलं आहे. खान सर हे एक लोकप्रिय शिक्षक आहेत. सोशल मीडिया आणि युट्यूबवर त्यांचं खान जीएस रिसर्च सेंटर नावाचं प्रसिद्ध चॅनेल आहे. ते आपल्या अनोख्या शिक्षण शैलीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

RRB-NTPC निकालाविरोधात विद्यार्थी आक्रमक; रेल्वेचं इंजिन पेटवलं, पोलिसांवर केली दगडफेक

रेल्वे विभागातील आरआऱबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांनी केला आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी आरा स्टेशनजवळील एका पॅसेंजर ट्रेनला आग लावली. विद्यार्थ्यांनी आरा स्टेशनवरील पश्चिम गुमटी जवळ उभ्या असलेल्या सासाराम आरा पॅसेंजरच्या इंजिनमध्ये आग लावली. परीक्षा पॅटर्नमधील बदल आणि निकालातील गैरप्रकाराविरोधात नाराज विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन करत रेल्वे ट्रॅक जाम केला होता. आंदोलनामुळं संबंधित ट्रॅकवरील वाहतूक बंद झाली होती. यानंतर सासाराम आरा पॅसेंजर ट्रेनला आऊटर जवळ थांबवण्यात आलं होतं. मात्र, विद्यार्थी तिथं पोहोचले आणि त्यांनी ट्रेनच्या इंजिनला आग लावून दिली. यानंतर इंजिन जळून गेलं. सितामढी रेल्वे स्टेशनवर आंदोलनावेळी काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. 
 

Web Title: rrb ntpc student protest case registered against patna khan sir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.