तामिऴनाडूसाठी १ हजार कोटीची मदत - नरेंद्र मोदी
By admin | Published: December 3, 2015 04:45 PM2015-12-03T16:45:20+5:302015-12-03T19:58:31+5:30
तामिळनाडूच्या मदतीसाठी मी तात्काळ १ हजार कोटी देण्याचे निर्देश दिले आहेत असे चेन्नईतील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
ऑनलाइन लोकमत,
चेन्नई, दि. ३ - मुसळधार पावसामुळे तामिळनाडूत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, या कठिण काळात भारत सरकार पूर्णपणे तामिळनाडूतील जनतेसोबत आहे. तामिळनाडूच्या मदतीसाठी मी तात्काळ १ हजार कोटी देण्याचे निर्देश दिले आहेत असे चेन्नईतील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
तमिळनाडू राज्याची राजधानी असलेल्या चेन्नईमध्ये झालेल्या विक्रमी पावसानंतर उद्भविलेल्या अस्मानी संकटाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले आहेत. या संकटामुळे शेकडो मृत्युमुखी पडलेल्या तमिळनाडूमध्ये पुढच्या दोन तीन दिवसांत आणखी पाऊस होण्याचा अंदाज भारतीय वेधशाळेने वर्तविला असून, यामुळे चेन्नईमधील परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे. चेन्नई, कांचीपुरम आणि तिरुवल्लुर येथील पूरग्रस्त परिस्थितीचा माहिती घेण्यासाठी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यादेखील या परिसराची हवाई पाहणी करणार आहेत.