औरंगाबाद-जळगाव मार्गासाठी १५५० कोटी रुपये मंजूर एकनाथराव खडसे : रावेर मतदारसंघातील रस्त्यांसाठी २२ कोटी
By admin | Published: November 27, 2015 09:33 PM2015-11-27T21:33:50+5:302015-11-27T21:33:50+5:30
जळगाव : औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ च्या चौपदरीकरणासाठी केंद्र शासनाने १५५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच या मार्गावरील जिल्ातील ५५ किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा शुभारंभ २५ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Next
ज गाव : औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ च्या चौपदरीकरणासाठी केंद्र शासनाने १५५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच या मार्गावरील जिल्ातील ५५ किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा शुभारंभ २५ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जि.प.चे.मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय उपस्थित होते. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचला १५५० कोटी रुपये मंजूर केले आहे. तसेच जळगाव जिल्ातून जाणार्या ५५ कि.मी. (वाकोद ते जळगाव) च्या रस्ते दुरुस्तीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे खडसे यांनी सांगितले. रावेर मतदारसंघातील रस्त्यांसाठी २२ कोटीजिल्ातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यासाठी खासदार रक्षा खडसे व खासदार ए.टी.पाटील यांचा केंद्राकडे पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार केंद्र शासनाने रावेर मतदारसंघातील रावेर, पिंप्री, नांदू, नायगाव ते भोळफाटा या राष्ट्रीय मार्गाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी, सावदा, हतनूर, मानपूर, चांगदेव ते राष्ट्रीय मार्ग क्रमांक ६ पर्यंतच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी ६ कोटी, कर्की, कोठा, बेलसवाडी, अंतुर्ली ते अंतुर्ली फाटा या रस्त्याच्या दुरस्तीसाठी ६ कोटी तसेच कळमोदा, न्हावी, हिंगोणा या रस्त्यासाठी ५ कोटी अशा एकूण २२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.तरसोद ते पाळधी फाट्यापर्यंत कॉक्रीटीकरणजळगाव शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तरसोद ते पाळधी फाट्यापर्यंतच्या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाच्या कामाला निधी मिळावा यासाठी आपण नितीन गडकरी यांच्याकडे विनंती केली. त्यानुसार त्यांनी या कामाचा प्रस्ताव मागविला आहे. एका किलोमीटरला ५ कोटी या प्रमाणे ७५ कोटी रुपयांच्या निधीला आठ ते १५ दिवसात तत्त्वता मान्यता मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.औरंगाबाद-नाशिक चौपदरीकरणासाठी साडे तीन हजार कोटीजळगाव- औरंगाबाद रस्त्यासोबतच केंद्र शासनाने औरंगाबाद, येवला, नाशिक या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी साडे तीन हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. २५ डिसेंबर रोजी या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.