सात रेल्वे उड्डाणपुलांसाठी २२० कोटी प्राप्त पी.जे.रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी ४० लाख : एकनाथराव खडसे यांनी घेतली बैठक

By admin | Published: June 29, 2016 08:01 PM2016-06-29T20:01:04+5:302016-06-29T20:01:04+5:30

जळगाव : नांदुरा व जळगाव जिल्‘ातील सहा रेल्वे उड्डाणपुलांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून २२० कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पाचोरा ते जामनेर या पी.जे.रेल्वे लाईनच्या ब्रॉडगेजला मंजुरी मिळाली असून वाढीव लाईनच्या सर्वेक्षणासाठी ४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

Rs. 40 lakhs for PJR survey of 220 crores for seven railway flyovers: Anandrao Khadse held meeting | सात रेल्वे उड्डाणपुलांसाठी २२० कोटी प्राप्त पी.जे.रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी ४० लाख : एकनाथराव खडसे यांनी घेतली बैठक

सात रेल्वे उड्डाणपुलांसाठी २२० कोटी प्राप्त पी.जे.रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी ४० लाख : एकनाथराव खडसे यांनी घेतली बैठक

Next
गाव : नांदुरा व जळगाव जिल्‘ातील सहा रेल्वे उड्डाणपुलांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून २२० कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पाचोरा ते जामनेर या पी.जे.रेल्वे लाईनच्या ब्रॉडगेजला मंजुरी मिळाली असून वाढीव लाईनच्या सर्वेक्षणासाठी ४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.
बैठकीला खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, भुसावळ रेल्वे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित ठवरे, दीपक कुमार, सिनिअर सेक्शन इंजिनिअर एन.पी.पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, भूसंपादन अधिकारी जितेंद्र पाटील उपस्थित होते. बैठकीत सात रेल्वे उड्डाण पुलांच्या कामासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीबाबत माहिती देण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे उड्डाणपुलासाठी १०० कोटी, बोदवड उड्डाणपुलासाठी ४० कोटी, सावदा रेल्वे उड्डाणपुलासाठी ३० कोटी, निंभारोसाठी ३२ कोटी, तर रावेर उड्डाणपुलासाठी १७ कोटी ७२ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. यात रावेर रेल्वे उड्डाणपुलासाठी राज्य शासनाच्या हिश्यांची ५० टक्के रक्कम प्राप्त झालेली नसल्याची माहिती देण्यात आली. यासह जळगाव शहरातील पिंप्राळा व शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलासाठी प्रत्येकी ५० लाखांचा निधी रेल्वे विभागाकडून प्राप्त झाला आहे. उर्वरित ५० टक्के निधीची रक्कम ही मनपाने उपलब्ध करून द्यायची असल्याचे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले.
मनपाची आर्थिकस्थिती चांगली नसल्याने या रेल्वे उड्डाणपुलांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी मनपाचा नाहरकत दाखला आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी या रेल्वे उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी निधी प्राप्त झाला असताना त्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. जमीन मालकांना रेडिरेकनरच्या प्रचलित नियमानुसार मोबदला देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पी.जे.रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी ५० लाख
पाचोरा ते जामनेर ही रेल्वे लाईन ब्रॉडगेजमध्ये रुपांतरित करण्यासाठी ११६ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. अजिंठा येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने पहूर ते अजिंठा या दरम्यानच्या १८.८० किमी तर जामनेर ते बोदवड या ३१.२५ कि.मी.रेल्वे लाईनला मंजुरी मिळाली आहे.

Web Title: Rs. 40 lakhs for PJR survey of 220 crores for seven railway flyovers: Anandrao Khadse held meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.