युको बँकेत ६४१ कोटींचा घोेटाळा; मुंबई व दिल्लीत मिळून १0 ठिकाणी छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 04:05 AM2018-04-15T04:05:18+5:302018-04-15T04:05:29+5:30
युनायटेड कमर्शियल बँक (युको बँक) या सार्वजनिक क्षेत्रातील ६४१ कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याच्या संदर्भात केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण कौैल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. कौल सन २०१० ते २०१५ अशी पाच वर्षे या बँकेचे अध्यक्ष होते.
नवी दिल्ली : युनायटेड कमर्शियल बँक (युको बँक) या सार्वजनिक क्षेत्रातील ६४१ कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याच्या संदर्भात केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण कौैल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. कौल सन २०१० ते २०१५ अशी पाच वर्षे या बँकेचे अध्यक्ष होते.
सीबीआयच्या सूत्रांनुसार, या अनुषंगाने शनिवारी दिल्लीत आठ व मुंबईत दोन ठिकाणी छापेही टाकण्यात आले. मात्र, याचा तपशील लगेच मिळाला नाही. काही दिवसांपूर्वी सीबीआयने याच युको बँकेमध्ये १६ व्यक्तींना सन २०१३ मध्ये १९ कोटी रुपयांचे गृहकर्जे सवलतीच्या दराने दिली गेल्याच्या संदर्भात गुन्हा नोंदविला होता.
बँकांचे प्रमुखही अडचणीमध्ये
आयसीआयसीआय बँक घोटाळ्यामुळे चंदा कोचर यापुढे
बँकेच्या प्रमुख राहणार की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे, तर अॅक्सिस बँकेच्या शिखा शर्मा यांना मुदतवाढ देण्याबाबत रिझर्व्ह बँकेने आक्षेप घेतल्यामुळे त्यांनी स्वत:च मुदत संपल्यानंतर पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
घोटाळ्यांची मालिकाच : पीएनबीतील नीरव मोदी व मेहुल चोकसी यांच्या घोटाळ्यानंतर आयसीआयसीआय, अॅक्सिस बँक, यांनीही आपल्याकडील घोटाळ्यांची माहिती पोलीस व संबंधित यंत्रणांना दिली. गेल्या चार महिन्यांत पीएनबीसह एकूण चार बड्या बँकांचे घोटाळे उघड झाल्याने, बँकिंग क्षेत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- मे.इरा इंजिनीअरिंग इन्फ्रा इंडिया लि. या कंपनीस दिलेली कर्जे अन्यत्र वळवून ते पैसे बुडविल्याशी संबंधित हा गुन्हा आहे. यात कौल यांच्याखेरीज कंपनीचे मालक हेम सिंग भराना यांच्याखेरीज पंकज जैन आणि वंदना शारदा हे दोन चार्टर्ड अकाउंटन्टही आरोपी आहेत.