विमान उड्डाणांवर ८,५00 रु. शुल्क
By admin | Published: November 12, 2016 02:18 AM2016-11-12T02:18:20+5:302016-11-12T02:18:20+5:30
छोट्या शहरांना हवाई मार्गाने जोडणाऱ्या उडाण (उड़े देश का आम नागरिक) योजनेला निधी मिळावा यासाठी सरकारने मोठ्या मार्गावरील विमान उड्डाणावर
Next
नवी दिल्ली : छोट्या शहरांना हवाई मार्गाने जोडणाऱ्या उडाण (उड़े देश का आम नागरिक) योजनेला निधी मिळावा यासाठी सरकारने मोठ्या मार्गावरील विमान उड्डाणावर ८,५00 रुपयांपर्यंत शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ डिसेंबरपासून हे शुल्क लागू होणार आहे. त्यामुळे विमान प्रवास महागणार आहे.
सामान्य माणसाला स्वस्तात विमानसेवेचा लाभ घेण्यासाठी उड्डाण योजना सुरू करण्यात आली आहे. एक तासाच्या उड्डाणासाठी अवघे २,५00 रुपयांचे भाडे या योजनेमध्ये लागणार आहे. नागरी विमान वाहतूक विभागाचे सचिव आर.एन. चौबे यांनी सांगितले की, अंतरानुसार शुल्क लागेल. ते जास्तीत जास्त ८,५00 रुपयांपर्यंत असेल.