मोहन भागवतांसोबतच्या 'त्या' खास भेटीनंतर मिथुन चक्रवर्तींची पहिली प्रतिक्रिया, सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 01:26 PM2021-02-16T13:26:42+5:302021-02-16T13:32:17+5:30

RSS Mohan Bhagwat And Mithun Chakraborty : पश्चिम बंगालमध्ये येत्या काही काळात निवडणुका असल्याने या निवडणुकीआधी मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या खास भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती.

RSS chief Mohan Bhagwat meets Mithun Chakraborty in Mumbai | मोहन भागवतांसोबतच्या 'त्या' खास भेटीनंतर मिथुन चक्रवर्तींची पहिली प्रतिक्रिया, सांगितलं नेमकं कारण

मोहन भागवतांसोबतच्या 'त्या' खास भेटीनंतर मिथुन चक्रवर्तींची पहिली प्रतिक्रिया, सांगितलं नेमकं कारण

Next

नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत ( Mohan Bhagwat) यांची मंगळवारी सकाळी भेट झाली. भागवत यांनी मिथुन चक्रवर्तींची त्यांच्या मुंबईच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये येत्या काही काळात निवडणुका असल्याने या निवडणुकीआधी मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या खास भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. या भेटीमुळे चक्रवर्ती यांचा भाजपा प्रवेशाच्या चर्चेला देखील पुन्हा एकदा सुरुवात झाली होती. मात्र आता भागवत यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

मिथुन चक्रवर्ती यांनी आजच्या भेटीबाबत अधिकृत माहिती दिली आहे. तसेच आजच्या भेटीचा राजकीय संबंध जोडू नये असं म्हणत भाजपातील पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.  "लखनऊमध्ये आमची याआधी भेट झाली होती. आमच्या भेटीमागचं कारण हे अध्यात्मिक ओढ आहे. मी त्यांना त्यावेळी घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार ते आज माझ्या मुंबईतील घरी आले. त्यामुळे अन्य कोणत्याही कारणाची चर्चा करू नका" असं मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  मंगळवारी सकाळी भागवत हे मिथुन चक्रवर्तींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते.

2019 मध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची देखील भेट घेतली होती. मिथुन चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसतर्फे राज्यसभेवर गेले होते. मात्र सदनात सतत अनुपस्थित राहात असल्याने त्यांनी 20 महिन्यांतच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते राजकारणापासून दूरच आहेत. यानंतर आता गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर असलेल्या मिथुन चक्रवर्ती आणि मोहन भागवत यांच्या खास भेटीने विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र याता या भेटीमागचं नेमकं कारण चक्रवर्ती यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: RSS chief Mohan Bhagwat meets Mithun Chakraborty in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.