घटस्फोटाचे प्रमाण सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये अधिक- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 11:01 AM2020-02-17T11:01:32+5:302020-02-17T11:02:09+5:30

सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाढत्या घटस्फोटाच्या प्रकरणांवर मतप्रदर्शन केलं आहे.

rss chief mohan bhagwat says divorce cases in educated affluent families |  घटस्फोटाचे प्रमाण सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये अधिक- मोहन भागवत

 घटस्फोटाचे प्रमाण सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये अधिक- मोहन भागवत

Next

अहमदाबाद : सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाढत्या घटस्फोटाच्या प्रकरणांवर मतप्रदर्शन केलं आहे. घटस्फोटाचे प्रमाण सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये अधिक असल्याचं भागवतांनी अधोरेखित केलं आहे. शिक्षण आणि संपन्नतेसोबत अहंकारही येतो. त्या कारणास्तव कुटुंबं विभक्त होतात, असं मोहन भागवत म्हणाले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत रविवारी संघाच्या स्वयंसेवकांशी अहमदाबादमध्ये बोलत होते.

घटस्फोटाची प्रकरणे आजकाल मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. किरकोळ कारणांवरून जोडपी भांडतात. सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाची प्रकरणे अधिक आढळतात. मी हिंदू आहे. सर्वधर्मीय श्रद्धांचा मी आदर करतो, मात्र माझ्या स्वत:च्या श्रद्धास्थानांबाबत मी आग्रही आहे. मला माझ्या कुटुंबाकडून संस्कार मिळाले आहेत आणि मातृशक्ती आम्हाला ते शिकवते, संघातील उपक्रमांबाबत स्वयंसेवकांनी आपल्या कुटुंबीयांनाही सांगावे, अशी आमची अपेक्षा आहे. कारण अनेकदा आपल्या कुटुंबातील महिलांना अधिक वेदनादायी कामं करावी लागतात. आपुलकीची भावना ही समाजाची ओळख आहे.

2 हजार वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेचं पालन करत असल्यानंच समाजात अशी परिस्थिती आहे. आपण महिलांना घरांपर्यंत मर्यादित ठेवलं आहे. अशी स्थिती 2 हजार वर्षांपूर्वी नव्हती. तो आपल्या समाजाचा सुवर्ण काळ आहे. हिंदू समाजानं सदगुणी आणि संघटित झालं पाहिजे. जेव्हा मी समाजासंदर्भात बोलतो तेव्हा फक्त ते पुरुषांसाठी नसतं. मी हिंदू आहे. मी सर्वच धर्मांच्या पवित्र स्थानांचा सन्मान करतो. परंतु मी आपल्या श्रद्धेच्या स्थानाप्रति कटिबद्ध आहे. मला हे संस्कार माझ्या कुटुंबीयांकडून मिळाले आहेत.

मला मातृशक्तीनेच हे गुण शिकवले आहेत. कुटुंब आणि महिलेशिवाय समाज पूर्ण होत नाही. जी अर्ध्या समाजाचं नेतृत्व करते आणि त्याला शिक्षित करते. परंतु समाजाची आम्ही चिंता करत नाही. भारताकडे हिंदू समाजाशिवाय कोणताही पर्याय नाही. हिंदू समाजाकडेही परिवारासारखं व्यवहार करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचंही मोहन भागवतांनी स्पष्ट केलं आहे.  

Web Title: rss chief mohan bhagwat says divorce cases in educated affluent families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.