Mohan Bhagwat, NCP: "मोहन भागवत यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावण्याची आवश्यकता"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 10:51 PM2022-10-08T22:51:58+5:302022-10-08T22:54:07+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त्यांचा खोचक टोला

RSS Chief Mohan Bhagwat should scold Pm Modi led BJP Government to end Caste System | Mohan Bhagwat, NCP: "मोहन भागवत यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावण्याची आवश्यकता"

Mohan Bhagwat, NCP: "मोहन भागवत यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावण्याची आवश्यकता"

Next

Mohan Bhagwat, NCP: जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था आणि दलितांना समान हक्क व समान संधी जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत दलितांवरील अत्याचार थांबणार नाही. त्यामुळे हे अशाप्रकारच्या व्यवस्था नष्ट करण्याचे विचार कृतीमध्ये आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला खडेबोल सुनावण्याची आवश्यकता आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे. मोहन भागवत यांनी जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था ही नष्ट केली पाहिजे असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा आधार घेत महेश तपासे यांनी हे मत व्यक्त केले.

"जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था नष्ट करावी म्हणून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला. त्यानंतरच्या काळात गणपतराव तपासे यांनी मंदिर प्रवेश कायदा आणून दलितांसाठी मंदिरे उघडी केली. मात्र हजारो वर्षांपासून ज्यांना शिक्षणापासून, रोजगारापासून, सामाजिक न्याय्य हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले. त्यांच्या संदर्भात मोदी सरकारच्या काळामध्ये दलितांवरील अत्याचार वाढले", असा आरोप तपासे यांनी केला.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी महेश तपासे यांनी मांडली. "देशात अट्रोसिटीची ११ टक्के वाढ ही २०१९ ते २०२१ मध्ये झाली आहे. आतापर्यंत सात लाख केसेस दाखल आहेत. अशा पध्दतीने दलितांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे केवळ वक्तव्य करण्यापेक्षा या संदर्भात RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्रातील सरकारला सक्त सूचना देण्याची आवश्यकता आहे", असा विचार महेश तपासे यांनी मांडला.

Web Title: RSS Chief Mohan Bhagwat should scold Pm Modi led BJP Government to end Caste System

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.