अखंड भारत पाकिस्तानसाठीदेखील चांगला, पण...; मोहन भागवत यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 19:08 IST2021-02-26T19:06:21+5:302021-02-26T19:08:54+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारताच्या आवश्यकेतविषयी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी अखंड भारताविषयी मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आपले विचार व्यक्त केले. भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान आताच्या घडीला संकटात आहे. त्यामुळे अखंड भारत पाकिस्तानसाठीही चांगला ठरू शकतो, असा दावा मोहन भागवत यांनी यावेळी बोलताना केला.

rss chief mohan bhagwat speaks on need of akhand bharat again | अखंड भारत पाकिस्तानसाठीदेखील चांगला, पण...; मोहन भागवत यांनी केले स्पष्ट

अखंड भारत पाकिस्तानसाठीदेखील चांगला, पण...; मोहन भागवत यांनी केले स्पष्ट

ठळक मुद्देअखंड भारताचा मोहन भागवत यांचा पुनरुच्चारअखंड भारत पाकिस्तानसाठी चांगला असल्याचा दावावसुधैव कुटुंबकमच्या माध्यमातून आनंद आणि शांतता शक्य

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारताच्या आवश्यकेतविषयी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी अखंड भारताविषयीमोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आपले विचार व्यक्त केले. भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान आताच्या घडीला संकटात आहे. त्यामुळे अखंड भारत पाकिस्तानसाठीही चांगला ठरू शकतो, असा दावा मोहन भागवत यांनी यावेळी बोलताना केला. (rss chief mohan bhagwat speaks on need of akhand bharat again)

अखंड भारत हा जबरदस्तीने किंवा बळाचा वापर करून नाही, तर हिंदू धर्माच्या माध्यमातून करणे अधिक संयुक्तिक ठरेल, असे मोहन भागवत यांनी सांगितले. जगत्कल्याणासाठी गौरवशाली अखंड भारताची आवश्यकता आहे. यासाठी देशभक्ती मोठ्या प्रमाणात जागृत करणे गरजेचे आहे. फाळणी झालेला भारत पुन्हा एकदा अखंड करणे काळाची गरज आहे. जे भारताला आता स्वतःचा भाग मानत नाही, त्यांना तर अधिक गरज आहे, असे मोहन भागवत म्हणाले.

देशभरातून नरेंद्र मोदीची हवा संपली, आता काँग्रेसला अनुकुल वातावरण: नाना पटोले

अखंड भारत आजही शक्य

भारताची फाळणी झाली, त्याच्या सहा महिन्यांपूर्वी असे कधी घडेल, याचा विचार कोणी स्वप्नातही केला नव्हता. फाळणी हे मुर्खांचे स्वप्न आहे, अशी प्रतिक्रिया जवाहरलाल नेहरून यांनी त्यावेळी दिली होती. मात्र, तरीही फाळणी झाली. तेव्हा फाळणी झाली असली, तरी आताच्या घडीला अखंड भारत शक्य आहे, असा दावा मोहन भागवत यांनी यावेळी बोलताना केला. 

वसुधैव कुटुंबकम

गंधार अफगाणिस्तान झाले. त्या क्षेत्रात शांतता नांदत आहे का, असा प्रश्न विचारत भारताची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. तेथेही शांतता नांदत नाही. भारत अनेक आव्हानांना सामोरा जाण्यास सक्षम आहे. वसुधैव कुटुंबकमच्या माध्यमातून जगात आनंद आणि शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते, असा विश्वास मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

Web Title: rss chief mohan bhagwat speaks on need of akhand bharat again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.