RSS देशाची सेवा करणारी संस्था, सर्वांना अभिमान असायला हवा; जगदीप धनखड स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 06:46 PM2024-07-31T18:46:07+5:302024-07-31T18:46:45+5:30
"राष्ट्रीय कार्यात गुंतलेल्या संस्थेवर टीका करणे हे संविधानाच्या विरोधात आहे."
Jagdeep Dhankhar on RSS: काँग्रेससह विरोधी पक्षांकडून सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) सातत्याने टीका केली जाते. आज (दि.31) देखील समाजवादी पक्षाचे खासदार राजीलाल सुमन यांनी आरएसएसवर जोरदार टीका केली. तर, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) RSS चा बचाव करताना दिसले. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करणे संविधानाच्या विरोधात आहे," अशी प्रतिक्रिया धनखड यांनी दिली. त्यांच्या या विधानामुळे सभागृहात गदारोळ झाला व विरोधी पक्षांनी सभात्याग केला.
#WATCHराज्यसभा के सभापति जगदीप धनखड़ ने कहा, "मैं यह नियम बनाता हूँ कि RSS एक ऐसा संगठन है जिसे इस राष्ट्र की विकास यात्रा में भाग लेने का पूरा संवैधानिक अधिकार है। इस संगठन की साख बेदाग है, इसमें ऐसे लोग शामिल हैं जो निस्वार्थ भाव से राष्ट्र की सेवा करने के लिए प्रतिबद्ध हैं।… pic.twitter.com/q9MmikaiQY
— ANI_HindiNews (@AHindinews) July 31, 2024
जगदीप धनखड पुढे म्हणतात, "राष्ट्रीय कार्यात गुंतलेल्या संस्थेवर टीका करणे हे संविधानाच्या विरोधात आहे. जे सदस्य हे करत आहेत, ते संविधान पायदळी तुडवण्यासारखे आहे. आरएसएस देशाची सेवा करणारी संस्था आहे. आरएसएसशी निगडित लोक निस्वार्थपणे हे काम करतात. त्यांनाही देशाच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याचा पूर्ण अधिकार आहे. आरएसएसची विश्वासार्हता निर्दोष आहे. राष्ट्रीय कल्याण आणि आपल्या संस्कृतीत RSS चे योगदान पाहून आनंद होतो. अशा कोणत्याही संस्थेचा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे.
सपा खासदाराचा काय आरोप?
समाजवादी पक्षाचे खासदार रामजीलाल सुमन यांनी एनटीए (National Testing Agency) अध्यक्षांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, सरकारसाठी या पदावर असणारी व्यक्ती संघाशी संबंधित आहे की, नाही हे महत्त्वाचे आहे, अशी टीकाही केली होती. यावर जगदीप धनखड संतापले आणि ही टिप्पणी रेकॉर्डवर येऊ दिली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले.