“स्वातंत्र्यवीर सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते, आजही लोकांना चुकीची माहिती”: मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 09:56 AM2021-10-13T09:56:13+5:302021-10-13T10:05:36+5:30

गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी विविध स्तरावरून मोठी विधाने केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

rss mohan bhagwat said savarkar was not enemy muslims many wrong thoughts about him today in country | “स्वातंत्र्यवीर सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते, आजही लोकांना चुकीची माहिती”: मोहन भागवत

“स्वातंत्र्यवीर सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते, आजही लोकांना चुकीची माहिती”: मोहन भागवत

Next
ठळक मुद्देस्वातंत्र्यवीर सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हतेवीर सावरकरांविषयी माहितीचा अभावहिंदुत्व एक होते, आहे आणि शेवटपर्यंत एक राहील

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी विविध स्तरावरून मोठी विधाने केली जात असल्याचे पाहायला मिळाले. अलीकडेच काँग्रेस नेते शशी थरूर यांनी वीर सावरकराच्या संसदेत लावलेल्या तसबिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशनावेळी वीर सावरकरांबाबत अनेक मोठी आणि महत्त्वाची विधाने करण्यात आली. स्वातंत्रवीर सावरकर हे मुस्लिमांचे शत्रू नव्हते. त्यांनी उर्दूमध्ये गझल लिहिल्यात. वीर सावरकरांबद्दल आजही चुकीची माहिती समाजात आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले आहे. 

स्वातंत्र्यापासून वीर सावरकरांविषयी लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे. पण आता लोक या पुस्तकाद्वारे वीर सावरकरांना ओळखू शकतील. त्यानंतर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि योगी अरविंद आहेत. त्यांच्याबद्दल योग्य माहितीही लोकांना उपलब्ध करून दिली जाईल, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. माहिती आयुक्त आणि माजी पत्रकार उदय माहूरकर यांच्या ‘वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ या पुस्तकाच्या उद्घाटन प्रसंगी भागवत बोलत होते. 

वीर सावरकरांविषयी माहितीचा अभाव

आजही भारतात वीर सावरकरांविषयी माहितीचा अभाव आहे, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीची माहिती आहे. जे भारतातील एकतेच्या विरोधात आहेत त्यांना सावरकर आवडत नाही. सावरकरांचा असा विश्वास होता की, राष्ट्रीयत्व त्यांच्या उपासनेच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करत नाही आणि ते हिंदू राष्ट्रीयत्व आहे. येथे प्रत्येकजण समान आहे, म्हणून विशेषाधिकारांबद्दल बोलू नका. हिंदुत्वाचे सावरकरांचे हिंदुत्व, विवेकानंदांचे हिंदुत्व असे वर्णन करणे ही आता एक फॅशन आहे. हिंदुत्व एक होते, आहे आणि शेवटपर्यंत एक राहील, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.

मतभेद स्वाभाविक आहेत

सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते आणि त्यांनी उर्दूमध्ये गझल लिहिली होती. मतभेद स्वाभाविक आहेत. जरी आपण वेगळे असलो तरी आपण एकत्र चालत राहू, वादविवाद होईल. हा आपल्या राष्ट्रीयत्वाचा मूलभूत घटक आहे. ज्यांना ते माहिती नाही त्यांनी सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम सुरू केली आहे, असे मोहन भागवत यांनी सांगितले. 
 

Web Title: rss mohan bhagwat said savarkar was not enemy muslims many wrong thoughts about him today in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.