'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 09:36 AM2024-06-14T09:36:35+5:302024-06-14T09:38:52+5:30

RSS on BJP : इंद्रेश कुमार म्हणाले, "परमेश्वराचा न्याय खरा आणि आनंददायी असतो. जे लोक त्याची उपासना करतात त्यांनी नम्र रहायला हवे आणि जे विरोध करतात परमेश्वर स्वतः त्यांच्याकडे बघतो.

RSS on BJP indresh kumar says those who became arrogant were stopped at 241 by Prabhu ramchandra | 'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा

'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा

निवडणुकीचा निकाल त्यांची (भाजप) वृत्ती दिर्शवतो. ते अहंकारी झाले होते. यामुळेच प्रभू रामचंद्रांनी त्यांना 241 वरच रोखलं, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांनी भाजपवर निशाणा साधला. ते जयपूर जवळील कनोता येथे आयोजित 'रामरथ अयोध्या यात्रा दर्शन पूजन समारंभादरम्यान बोलत होते.

इंद्रेश कुमार कुणाचेही नाव न घेता म्हणाले, "निवडणुकीचा निकाल त्यांची वृत्ती दिर्शवतो. ते अहंकारी झाले होते. पक्षाने आधी भक्ती केली, त्यानंतर ते अहंकारी झाले. प्रभू रामचंद्रांनी त्यांना 241 वरच रोखले. मात्र, सर्वात मोठा पक्ष बनवले. इंद्रेश कुणार यांचा रोख भाजपकडे होता. याशिवाय, ज्यांचा प्रभू रामचंद्रांवर विश्वास नव्हता त्यांना 234 वरच थांबवले, असेही ते म्हणाले. म्हणजेच I.N.D.I.A. आघाडी.

अहंकारी झाले होते म्हणून... -
इंद्रेश कुमार म्हणाले, लोकशाहीत रामराज्याचे विधान बघा, त्यांनी रामाची पूजा केली, पण हळूहळू अहंकारी झाले. सर्वात मोठा पक्ष बनला, मात्र, जी मते मिळायला हवी होती ती प्रभू रामाने अहंकारामुळे रोखली. तसेच, रामचंद्रांना विरोध करणाऱ्यांना सत्ता मिळू शकली नाही. ते सर्व मिळून दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

प्रभू रामचंद्र भेदभाव करत नाहीत -  
इंद्रेश कुमार म्हणाले, "परमेश्वराचा न्याय खरा आणि आनंददायी असतो. जे लोक त्याची उपासना करतात त्यांनी नम्र रहायला हवे आणि जे विरोध करतात परमेश्वर स्वतः त्यांच्याकडे बघतो. प्रभू रामचंद्र भेदभाव करत नाही अथवा शिक्षाही करत नाहीत. राम कोणाला शोकही करवत नाहीत. ते सर्वांना न्याय देतात. ते देतात आणि देत राहतील. प्रभू राम नेहमीच न्यायी होते आणि राहतील. एवढेच नाही तर, एकीकडे त्यांनी प्रजेचे रक्षणही केले आणि दुसरीकडे रावणाचे भलेही केले, असेही इंद्रेश कुमार म्हणाले.

Web Title: RSS on BJP indresh kumar says those who became arrogant were stopped at 241 by Prabhu ramchandra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.