सहारनपूर हिंसेसाठी BJP-RSS जबाबदार- मायावती
By admin | Published: May 24, 2017 04:19 PM2017-05-24T16:19:17+5:302017-05-24T16:33:28+5:30
सहारनपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसेचा प्रकार समोर आला आहे. हिंसेनंतर राजकीय वक्तव्यांनाही उधाण आलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 24 - सहारनपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसेचा प्रकार समोर आला आहे. हिंसेनंतर राजकीय वक्तव्यांनाही उधाण आलं आहे. भारतीय जनता पार्टीनं सहारनपूर हिंसेसाठी मायावतींना जबाबदार धरलंय. तर बहुजन समाज पार्टीनं भाजपावर पलटवार केला आहे.
मायावती म्हणाल्या, सहारनपूरच्या हिंसेसाठी भाजपा जबाबदार आहे. भाजपा आणि संघ समाजातले जातीयवादी तत्त्व बिघडवण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी बहुजन समाज पार्टीचे चार जण आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटणार आहेत. या नेत्यांमध्ये सतीश मिश्र, राम अचल राजभर, लालजी वर्मा, माजी मंत्री इंदरजीत सरोज यांचाही समावेश होता. सीपीआय(एम)ने एक प्रसिद्धिपत्रक जारी करत सहारनपूर हिंसेचा निषेध नोंदवला आहे. सीपीआय(एम)च्या मते, मायावतींच्या रॅलीनंतर झालेल्या हिंसेसाठी हिंदू युवा वाहिनी जबाबदार आहे.
उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री श्रीकांत शर्मा यांनी सांगितलं की, सहारनपूरमध्ये शांती प्रस्थापित झाली आहे. मात्र मायावती स्वतःच्या राजकीय भाक-या भाजण्यासाठी तिथे गेल्या. त्यानंतर तिथली परिस्थिती चिघळली. दोषीविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही शर्मा यांनी सांगितलं आहे. सहारनपूरमध्ये झालेल्या जातीय हिंसेनंतर पोलीस आणि प्रशान गंभीर स्वरूपात दिसले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर गृहसचिव मणिप्रसाद मिश्रा, एजीडी(कायदा-सुव्यवस्था) आदित्य मिश्रा, आयजी (एसटीएफ) अमिताभ यश, डीआयजी विजय भूषण सहीत इतर अधिकारी सहारनपूरमध्ये तंबू ठोकून बसले आहेत. राज्य सरकारनं मृतांना 15 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
तत्पूर्वी सहारनपूरमध्ये ठाकूर आणि दलितांमधल्या दोन गटांत वाद उफाळून आला होता. बुधवारी सकाळच्या सुमारास जनकपुरीतल्या जनता रोडवर एका व्यक्तीवर गोळी झाडण्यात आली. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर बडगावमध्येही दोघांवर चेहरा झाकून एका अज्ञातानं गोळीबार केला. त्या गोळीबारात रस्त्यावरच दोघे ठार झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, हे प्रकार दलितांनी घडवून आणले आहेत. सहारनपूर परिसरात जबरदस्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. एसएसपी सुभाषचंद्र यांनी सहारनपूर हिंसेप्रकरणी आतापर्यंत 24 जणांना अटक केली आहे.