आरएसएस भारतातील दहशतवादी संघटना; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पणतूचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 03:35 PM2020-01-27T15:35:59+5:302020-01-27T15:41:42+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी ते कर्नाटकमधील एका सभेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या पाकिस्तानमधील भाषणाचा हवाला दिला.

RSS is Terrorist Organization of India; Dr. Babasaheb Ambedkar's great-grandson allegation | आरएसएस भारतातील दहशतवादी संघटना; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पणतूचा आरोप

आरएसएस भारतातील दहशतवादी संघटना; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पणतूचा आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देआरएसएस भारतातील अतिरेकी संघटना आहे. या संघटनेवर बंदी आणा.या संघटनेचे लोक आज दहशतवादी कृत्यामध्ये पकडले जात आहेत.

बेंगळुरू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील दहशतवादी संघटना आहे आणि याचे पुरावेही आपल्याकडे असल्याचा गंभीर आरोप भारतीय संविधानाचे निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केला आहे. 


प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी ते कर्नाटकमधील एका सभेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या पाकिस्तानमधील भाषणाचा हवाला दिला. तेथे मी म्हटले होते की आरएसएस भारतातील अतिरेकी संघटना आहे. या संघटनेवर बंदी आणा. माझ्याकडे पुरावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजुला साध्वी बसलेली आहे. ती मुलाखतीत सांगते की, जेव्हा भारतीय सैन्याकडील दारुगोळा, बंदुका संपल्या, तेव्हा आरएसएसने त्यांना ती पुरविली. आरएसएसकडे एवढे बॉम्ब कसे आणि कुठून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंदुका कुठून आल्या, असा प्रश्न त्यांनी विचारला. 



पंतप्रधानांच्या बाजुला बसलेली साध्वी अशा प्रकारचे वक्तव्य करते. ज्या घरात बॉम्ब सापडला ते घर किंवा घरातील मुलगा दहशतवादी ठरत नाही का. मग जर या संघटनेकडे जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारुगोळा असेल तर ही संघटना दहशतवादी नाही का होत, असा आरोप राजरत्न यांनी केला. या संघटनेचे लोक आज दहशतवादी कृत्यामध्ये पकडले जात आहेत. अशा संघटनेवर जागतिक बंदी आणण्याची गरज आहे. ते काम आम्ही करत आहोत, असेही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले. 
 

Web Title: RSS is Terrorist Organization of India; Dr. Babasaheb Ambedkar's great-grandson allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.