आर.टी.ई. प्रतिक्रीया

By admin | Published: February 10, 2015 12:56 AM2015-02-10T00:56:24+5:302015-02-10T00:56:24+5:30

RTE Reaction | आर.टी.ई. प्रतिक्रीया

आर.टी.ई. प्रतिक्रीया

Next
>आर.टी.ई. प्रतिक्रिया

भीतीचे काही कारण नाही
प्रवेश प्रक्रियेच्या बाबत पालकांनी कुठलीही चिंता व भीती बाळगण्याचे कारण नाही. पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी उपलब्ध राहतील. कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास ते कार्यालयाशी संपर्क करू शकतात.
किशोर चौधरी, प्राथमिक शिक्षणाधिकारी

डिसेंबर महिन्यात व्हावी प्रवेश प्रक्रिया
प्रशासनाने आरटीई प्रवेश प्रक्रियेपूर्वीच तयारी करण्याची आवश्यकता होती. डिसेंबर महिन्यात खासगी शाळेचे प्रवेश पूर्ण होऊन जातात. तर मार्च महिन्यात आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते. त्यामुळे बहुतांश खासगी शाळा ॲडमिशन पूर्ण झाल्याचे कारण देत आरटीईमध्ये भाग घेण्यासाठी टाळाटाळ करतात.
जफर अहमद खान, अध्यक्ष, नागपूर जिल्हा मुख्याध्यापक संघ

आरटीई ॲक्शन कमिटीच्या माध्यमातून पालकांना मार्गदर्शन
आरटीईची ऑनलाईन प्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या प्रक्रियेत पालकांना ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आरटीईचा लाभ घेणारे बहुतांश पालक फारसे शिक्षित नाही, अशा पालकांना अडचणीचे जाऊ नये म्हणून शिक्षण विभागाने आरटीई ॲक्शन कमिटीला पालकांचे मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी कमिटी शहरातील सिव्हिल लाईन, सदर, जाफरनगर, मोहननगर व सीताबर्डी येथे केंद्र सुरू करणार आहे. त्याचबरोबर पालकांसाठी ८७९६१२१२१३ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. कमिटीच्या माध्यमातून पालकांना शाळेची यादी, फॉर्मला जोडण्यासाठी आवश्यक असणारे दस्तऐवज, प्रवेश प्रक्रियेची माहिती, शाळा आणि प्रशासनात समन्वय ठेवण्यात येणार आहे. पालकांना अडचणी आल्यास ते आमच्याशी संपर्क साधू शकतात.
शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई ॲक्शन कमिटी

Web Title: RTE Reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.