पंतप्रधान मोदींकडे नागरिकत्वाचे दाखले आहेत का? पीएमओ म्हणतं...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 09:36 AM2020-03-02T09:36:27+5:302020-03-02T09:41:58+5:30
मोदींकडे नागरिकत्व दाखले आहेत का, असा प्रश्न आरटीआयमधून विचारण्यात आला होता.
नवी दिल्ली: सध्या देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यावरुन वातावरण तापलंय. शाहीन बागेसह अनेक ठिकाणी सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलनं सुरू आहेत. एनआरसी लागू झाल्यास नागरिकत्व जाईल, अशी भीती व्यक्त केली जातेय. याच पार्श्वभूमीवर माहिती अधिकाराच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे असलेल्या नागरिकत्व दाखल्यांचा तपशील मागण्यात आला होता. मोदींचा जन्म भारतात झाल्यानं त्यांना नागरिकत्व दाखल्यांची आवश्यकता नसल्याचं उत्तर पंतप्रधान कार्यालयानं दिलं आहे.
द क्विंट या संकेतस्थळानं दिलेल्या वृत्तानुसार, शुभांकर सरकार यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या नागरिकत्वाबद्दलचा तपशील मागितला होता. त्यावर नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम ३ अंतर्गत पंतप्रधान मोदी जन्मानं भारतीय आहेत. त्या आधारे ते भारतीय ठरतात. त्यामुळे त्यांच्या नागरिकत्व दाखल्यांचा प्रश्नच उद्भवत नाही, असं उत्तर पंतप्रधान कार्यालयानं दिलं.
If PM @narendramodi does not require to register his citizenship, as per Section 3 of the Citizenship Act 1955, then why should others?
— seemi pasha (@seemi_pasha) February 29, 2020
Here is the PMO’s response to an RTI filed by Subhankar Sarkar (632/2020-PME) #CAA_NRC_NPR#DelhiRiot2020#DoubleStandardspic.twitter.com/WydrnFMZt8
नागरिकत्व कायदा १९५५ चं कलम ३ नेमकं काय?
नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम ३ मध्ये भारतीय नागरिकत्वाचा उल्लेख आहे. यानुसार उपकलम २ सोडून प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे. त्यामुळे २६ जानेवारी १९५० ते १ जुलै १९८७ दरम्यान भारतात जन्मलेली व्यक्ती भारतीय ठरते. १ जुलै १९८७ पासून नागरिकत्व संशोधन कायदा २००३ लागू होईपर्यंत भारतात जन्मलेली किंवा आई-वडिलांपैकी कोणीही भारतीय असलेली व्यक्ती भारतीय ठरते. नागरिकत्व संशोधन कायदा २००३ लागू झाल्यानंतर मात्र यात थोडा बदल होतो. २००३ नंतर जन्मलेल्या व्यक्तीचे आई-वडील भारतीय असल्यास ती व्यक्ती भारतीय नागरिक ठरते. या व्यक्तीच्या आई-वडिलांपैकी एकही जण अवैध प्रवासी असल्यास ती भारतीय नागरिक ठरत नाही.
माहिती अधिकाराच्या माध्यमातून याआधीही पंतप्रधान मोदींबद्दल विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. मोदी राजकारणात येण्यापूर्वी रामलीलामध्ये काम करायचे का, मोदी रामलीलामध्ये काम करत होते, तर मग तिथे ते कोणतं पात्र साकारायचे, असे अजब प्रश्न आतापर्यंत माहिती अधिकारातून विचारण्यात आले आहेत. मोदींचा मोबाईल नंबर, त्यांना वर्षाकाठी किती सिलिंडर लागतात, त्याचं बिल उपलब्ध आहे का, असे प्रश्नदेखील पंतप्रधान कार्यालयाला विचारले गेले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंचा बचाव; आशिष शेलार अन् चंद्रकांत पाटलांना दिलं 'असं' उत्तर
...तर तो हिंदूंच्याच हातून मार खाईल; शिवसेनेचा भाजपावर निशाणा
India vs New Zealand, 2ndTest: न्यूझीलंडकडून भारताला व्हाईटवॉश; दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली
तुर्कीचा सीरियावर ड्रोन हल्ला, 19 सैनिकांचा मृत्यू