UPA सरकारमध्येही व्हायचं टॅपिंग; दर महिन्याला 9 हजार कॉल्स, 500 इमेल्सची पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 10:06 AM2018-12-23T10:06:53+5:302018-12-23T10:07:02+5:30

कॉम्प्युटर आणि संचार साधनांवर पाळत ठेवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

rti reveals as many 9000 phones 500 e mails intercepted each month during upa | UPA सरकारमध्येही व्हायचं टॅपिंग; दर महिन्याला 9 हजार कॉल्स, 500 इमेल्सची पडताळणी

UPA सरकारमध्येही व्हायचं टॅपिंग; दर महिन्याला 9 हजार कॉल्स, 500 इमेल्सची पडताळणी

Next

नवी दिल्ली- कॉम्प्युटर आणि संचार साधनांवर पाळत ठेवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता आरटीआयमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए सरकार प्रत्येक महिन्याला 9 हजार कॉल्स रेकॉर्ड करत होती. तसेच 500 इमेल्सवरही पाळत ठेवत असल्याचंही समोर आलं आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वातील मनमोहन सरकारनं हजारो फोन कॉल्स आणि इमेल इंटरसेप्ट केले होते. गृहमंत्रालयानं आरटीआयच्या अर्जाला दिलेल्या उत्तरातून हे उघड झालं आहे. केंद्र सरकार सरासरी 7500 ते 9000 फोन कॉल्स इंटरसेप्शन करण्याचे आदेश देत होतं. 
6 ऑगस्ट 2013च्या प्रसेनजीत मंडळ यांच्या आरटीआय उत्तरात गृह मंत्रालयानं सांगितलं की, केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला 7500-9000 फोन कॉल्स रेकॉर्ड केले जात होत. तसेच प्रत्येक महिन्याला 300 ते 500 इमेल्सवरही नजर ठेवली जात होती. टेलिग्राफ एक्टनुसार संस्थांना फोन कॉल्स आणि इमेल इंटरसेप्शन करण्याचे अधिकार प्राप्त असल्याचाही या आरटीआयमधून खुलासा करण्यात आला होता. 
 

Web Title: rti reveals as many 9000 phones 500 e mails intercepted each month during upa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.