Coronavirus RT-PCR, India: सावधान! 'या' ६ देशांतून भारतात येत असाल तर RT-PCR करावीच लागणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 03:21 PM2022-12-29T15:21:01+5:302022-12-29T15:22:06+5:30

नववर्ष साजरे करण्यासाठी अनेक लोक या देशांमध्ये गेले आहेत.

RTPCR test has been made mandatory in India for flyers coming from these 6 countries from 1st January 2023 | Coronavirus RT-PCR, India: सावधान! 'या' ६ देशांतून भारतात येत असाल तर RT-PCR करावीच लागणार!

Coronavirus RT-PCR, India: सावधान! 'या' ६ देशांतून भारतात येत असाल तर RT-PCR करावीच लागणार!

Next

Coronavirus RT-PCR, India: जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीने पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केलं आहे. भारतात अद्याप तरी कोरोनाची चौथी लाट आलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊनचा धोका नक्कीच नाही. पण भारत सरकार आणि आरोग्य मंत्रालय भारतातील कोरोनाचा प्रसार वेळीच रोखण्यासाठी विविध उपाययोजना करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून सरकारने १ जानेवारीपासून भारताजवळ असलेल्या ६ देशांमधून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला RT-PCR चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी निर्णय जाहीर केला. त्यामुळे आता या निर्णयामुळे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी देशाबाहेर गेलेल्या अनेकांना ही चाचणी करूनच भारतात प्रवेश मिळणार आहे.

ते ६ देश कोणते?

देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती दिली आहे. १ जानेवारी २०२३ पासून चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड या सहा देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी RTPCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यांना प्रवासापूर्वीच त्यांचे RTPCR चाचणीचे रिपोर्ट्स हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: RTPCR test has been made mandatory in India for flyers coming from these 6 countries from 1st January 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.