रफुचक्कर झालेले प्रेमीयुगूल परतले
By admin | Published: March 5, 2016 11:47 PM2016-03-05T23:47:24+5:302016-03-05T23:47:24+5:30
जळगाव: गेल्या आठवड्यात जळगावातून रफुचक्कर झालेले अल्पवयीन प्रेमीयुगूल शनिवारी परतले व एमआयडीसी पोलीस स्टेशनला हजर झाले. प्रेमप्रकरणाचे बींग फुटल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी दोघांनी सुरत येथे पळ काढला होता. मुलगी गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या पालकांनी तिच्या प्रियकराविरुध्द तक्रार दिली होती. त्यावर त्याच्याविरुध्द फूस लावून अपहरण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरतहून हे दोघं जण पुन्हा जळगावात आले. तेथून कुठेच न जाता स्टेशनवरुन पुन्हा नाशिकला गेले. तेथे मुलाच्या नातेवाईकाकडे राहिल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागल्याने शनिवारी दोघांनी जळगाव गाठले.यावेळी मुलीने माझे त्या तरुणासोबत प्रेम संबंध आहेत, कुटूंबाकडून मारहाण होण्याच्या भीतीनेच मी त्याच्यासोबत गेली होती, त्याने माझे अपहरण केले नाही असा जबाब पोलिसांना दिला. त्यानंतर मुल
Next
ज गाव: गेल्या आठवड्यात जळगावातून रफुचक्कर झालेले अल्पवयीन प्रेमीयुगूल शनिवारी परतले व एमआयडीसी पोलीस स्टेशनला हजर झाले. प्रेमप्रकरणाचे बींग फुटल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी दोघांनी सुरत येथे पळ काढला होता. मुलगी गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या पालकांनी तिच्या प्रियकराविरुध्द तक्रार दिली होती. त्यावर त्याच्याविरुध्द फूस लावून अपहरण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरतहून हे दोघं जण पुन्हा जळगावात आले. तेथून कुठेच न जाता स्टेशनवरुन पुन्हा नाशिकला गेले. तेथे मुलाच्या नातेवाईकाकडे राहिल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागल्याने शनिवारी दोघांनी जळगाव गाठले.यावेळी मुलीने माझे त्या तरुणासोबत प्रेम संबंध आहेत, कुटूंबाकडून मारहाण होण्याच्या भीतीनेच मी त्याच्यासोबत गेली होती, त्याने माझे अपहरण केले नाही असा जबाब पोलिसांना दिला. त्यानंतर मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.