अडाणी चोरांनी ATM ऐवजी पासबूक प्रिटिंग मशीन केली चोरी
By admin | Published: September 1, 2016 01:42 PM2016-09-01T13:42:59+5:302016-09-01T14:14:24+5:30
बँकेत एटीएम मशीन चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोरांना एटीएम मशिन चोरता आली नाही. पण त्याऐवजी त्यांनी चक्क पासबूक प्रिटिंग मशीन उचलून नेली.
Next
>- ऑनलाइन लोकमत
दिसपूर, दि. 1 - शिक्षणाचं महत्व किती असतं हे आसाममधील चोरांनीच पटवून दिलं आहे. चोरी केल्यानंतर चोरांनाही हसावं की रडावं कळलं नसेल. बँकेत एटीएम मशीन चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोरांना एटीएम मशिन चोरता आली नाही. पण त्याऐवजी त्यांनी चक्क पासबूक प्रिटिंग मशीन उचलून नेली. पोलिसांनी या चोरांना अटक केली असून पासबूक प्रिटिंग मशीन जप्त केली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) इमारतीत चोरीच्या उद्देशाने घुसलेले हे चोर इमारतीतून बाहेर पडताना पोलिसांना शंका आल्याने त्यांचा पाठलाग केला. पेट्रोलिंग करणा-या पोलिसांच्या वाहनाने चोरांचा पाठलाग करुन त्यांना गाठलं. चोरांची तपासणी केली असताना पासबूक प्रिटिंग मशीन चोरल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. साहब अली, सैफुल रहमान, मैनूल आणि सद्दाम हुसेन अशी या चोरांची नावे आहेत.