बेपत्ता हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले, सर्व क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची भीती
By Admin | Published: July 5, 2017 09:12 PM2017-07-05T21:12:37+5:302017-07-05T21:12:37+5:30
अरुणाचल प्रदेशमध्ये काल बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - अरुणाचल प्रदेशमध्ये काल बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत. हेलिकॉप्टरमधील सर्व क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अरुणाचल प्रदेशच्या पापुमपरे भागामध्ये हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत.
मंगळवारी पूरस्थिती असलेल्या परिसरामध्ये मदतकार्य करत असताना अरुणाचल प्रदेशमधील सगली गावाजवळ हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते. या हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. अरुणाचल प्रदेशच्या सगली गावाजवळ हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.
खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर रडारवरून गायब झाल्याची माहिती आहे. इटानगर ते नहरलगूनदरम्यान हेलिकॉप्टर अचानक रडारवरून गायब झालं होतं. हवाई दलाचं हे हेलिकॉप्टर पूरस्थिती असलेल्या परिसरांमध्ये बचाव मोहिमेवर होतं. ही घटना घडली त्याचवेळी केंद्रीय गृह राज्य मंत्री किरेन रिजिजू यांच्या हेलिकॉप्टरचीही इमर्जन्सी लॅन्डिंग करावी लागली. इटानगरमध्ये पॉलिटेक्निक क्रीडा मैदानात रिजिजू यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डिंग केलं होतं. रिजिजू यांनीच मीडियाला याबाबत माहिती दिली.
आणखी वाचा
(हेलिकॉप्टर उड्डाणाचे मानदंड ठरविणार)
(हेलिकॉप्टर कोसळले; मुख्यमंत्री बचावले!)
सिन्हा म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातावेळी तर जमिनीवरील धुरळा उडू नये, यासाठी साधे पाणी मारण्याची देखील खबरदारी घेतली नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातासह इतर अपघातांच्या कारणांची सखोल तपासणी सुरू आहे. वैद्यकीय आणि धार्मिक पर्यटनासाठी हेलिकॉप्टरने प्रवास केला जातो. त्यासाठी अगदी दुर्गम भागातही जावे लागते.