न्यायाधीशांच्या नेमणुकीची महिनाअखेरीस नियमावली
By admin | Published: February 14, 2017 12:42 AM2017-02-14T00:42:00+5:302017-02-14T00:42:00+5:30
सर्वोच्च व उच्च न्यायालयांवरील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्यासंबंधीच्या नव्या नियमावलीस (मेमोरेंडम आॅफ प्रोसिजर-एमओपी) कदाचित या महिन्याच्या अखेरीस
नवी दिल्ली : सर्वोच्च व उच्च न्यायालयांवरील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्यासंबंधीच्या नव्या नियमावलीस (मेमोरेंडम आॅफ प्रोसिजर-एमओपी) कदाचित या महिन्याच्या अखेरीस अंतिम स्वरूप दिले जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी संकेत दिले.
न्यायाधीश नेमणुकांसंबंधी एका वकिलाने केलेल्या जनहित याचिकेच्या निमित्ताने हा विषय निघाला असता सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग केहर यांनी हे सूचित केले.
सरकारने केलेला न्यायिक नियुक्ती आयोग नेमण्याचा कायदा रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीची कॉलेजियम पद्धत पुनरुज्जीवित केल्यानंतर सरकार व न्यायालय प्रशासन यांच्यातील मतभेदांमुळे ‘एमओपी’चे घोंगडे गेले वर्षभर भिजत पडले आहे. (वृत्तसंस्था)