‘सातच्या आत घरात’चा नियम मुलींच्याच हिताचा, मंत्री मनेका गांधींचे मत
By admin | Published: March 8, 2017 01:38 AM2017-03-08T01:38:38+5:302017-03-08T01:38:38+5:30
मुलींचे १६-१७ वर्षे हे वय संप्रेरकिय प्रस्फूटीचे (हार्मोनल आऊटबर्स्ट) वय असल्याने या वयातील मुलींना रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू न देणे हे त्यांच्याच सुरक्षेच्या
नवी दिल्ली : मुलींचे १६-१७ वर्षे हे वय संप्रेरकिय प्रस्फूटीचे (हार्मोनल आऊटबर्स्ट) वय असल्याने या वयातील मुलींना रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू न देणे हे त्यांच्याच सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे ठरते, असे मत केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी व्यक्त केले.
एका वृत्तवाहिनीवर रात्री त्या बोलत होत्या. रात्री उशिरापर्यंत घराबाहेर न राहण्याचे बंधन फक्त मुलींनाच का असावे व मुलांना का असू नये? या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या. ही चर्चा प्रामुख्याने विद्यापीठांच्या कॅम्पसमधील महिलांच्या सुरक्षेविषयी होती.
मनेका गांधी म्हणाल्या, पालक म्हणून जेव्हा मी माझ्या मुलीला (किंवा मुलालाही) कॉलेजमध्ये पाठविते तेव्हा ती सुरक्षित
राहावी, अशी माझी अपेक्षा
असते. स्वत:च स्वत:पासून सावध राहणे हाही सुरक्षित राहण्याचा एक मार्ग असू शकतो. मुली १६-१७ वर्षांच्या असतात, तेव्हा निसर्गनियमांनुसार तुम्ही संप्रेरकिय स्रवणाने उत्तेजीत स्थितीत असता. या काळात तुम्हाला सांभाळून राहणे गरजेचे असते. त्यासाठीच एक लक्ष्मणरेखा आखावी लागते. ती मुलींच्याच सुरक्षेसाठी गरजेचीही असते. (लोकमत न्यूज नेटवर्क)