नियम बदलला! Fastag असला तरीही टोलनाक्यांवर जबर दंड बसणार; ही चूक टाळाच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 03:03 PM2020-05-17T15:03:44+5:302020-05-17T15:05:42+5:30
लॉकडाऊन असल्याने अनेकांचे वाहनांकडे लक्ष नाहीय. आता सरकारने आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी दिली आहे. मात्र, आजचा नियम या वाहन चालकांसाठी डोकेदुखीचा ठरणार आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने गेल्या वर्षीपासून महामार्गांवरील टोल नाक्यांवर फास्टॅग सक्तीचे केले आहेत. मात्र, बऱ्याचदा फास्टॅग स्कॅन न होणे, खात्यात पुरेशी रक्कम नसणे आदी प्रकार घडत होते. यामुळे टोलची रक्कम घेऊनच सोडले जात होते. यात वेळ जात होता. आता केंद्र सरकारने नियम बदलला आहे.
लॉकडाऊन असल्याने अनेकांचे वाहनांकडे लक्ष नाहीय. आता सरकारने आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी दिली आहे. मात्र, आजचा नियम या वाहन चालकांसाठी डोकेदुखीचा ठरणार आहे. जर फास्टॅगमध्ये रिचार्ज नसेल तर ते लगेचच करून घ्या. नाहीतर जबर दंड भरावा लागणार आहे.
केंद्र सरकारने बदललेल्या नियमामध्ये जर एखादा वाहनचालक त्याच्या वाहनाचा फास्टॅग योग्य प्रकारे काम करत नसेल किंवा त्यांमध्ये पैसे नसतील आणि तो जर फास्टॅग लेनमध्ये घुसला असेल तर त्याला टोलच्या दुप्पट दंड आकारला जाणार आहे. केंद्र सरकारने याची अधिसूचना १५ मेपासून देशभर लागू केली आहे.
दुप्पट टोल'दंड' वाचणार; FASTag आता भीम अॅपद्वारेही रिचार्ज करता येणार
केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फास्टॅग सक्तीचा करून काही महिने झाले आहेत. तरीही लोक फास्टॅगला गंभीरतेने घेत नाहीत. अनेकदा फास्टॅग आहे पण त्यामध्ये पैसेच टाकलेले नसल्याचे समोर आले आहे. हे लोक फास्टॅगच्या रांगेत घुसतात आणि यामुळे मूळ उद्देशाला हरताळ फासला जातो. मोठमोठ्या रांगा लागतात. तर काही प्रकरणे अशी आहेत की, फास्टॅग खराब झाले आहेत किंवा आतील सर्किट तुटले आहे. बँकांनी केवायसी न केल्याने फास्टॅग निलंबित केले आहेत. अशा लोकांना आता दुप्पट दंड द्यावा लागणार आहे.
दंड वाचविण्यासाठी काय कराल?
फास्टॅग प्रणाली १५ डिसेंबर २०१९ पासून लागू करण्यात आली होती. वाहनांना थांबावे लागू नये आणि वेळेसोबत इंधनही वाचावे असा यामागचा उद्देश होता. ज्यांचे फास्टॅग सुरु नाहीत किंवा समस्या आहे त्यांच्यासाठी प्रत्येक टोलनाक्यावर कॅशलेन सुरु ठेवण्यात आली आहे. एकतर फास्टॅग सुरु करणे किंवा या लेनचा वापर करणे फायद्याचे ठरणार आहे.
If a vehicle which is not fitted with FASTag or a vehicle without a valid or functional FASTag, enters into “FASTag lane” of fee plazas, then they shall pay a fee equivalent to two times of the fee applicable to that category of vehicles: Ministry of Road Transport & Highways
— ANI (@ANI) May 17, 2020
महत्वाच्या बातम्या....
लॉकडाऊनमध्येही मुली असुरक्षित; नराधम भावाकडून चुलत बहिणीवर बलात्कार
CoronaVirus चीनच दोषी! अमेरिकेचे आरोप खरे ठरले; कोरोनाचे सॅम्पल नष्ट केल्याचे मान्य
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घेरले; चकमकीत योद्धा शहीद
'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...
सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार
न भूतो! रॉयल एनफिल्डच्या बुलेटवर कधी नव्हे तेवढी ढासू ऑफर
CoronaVirus चीनला मोठा झटका! कायमचा बायबाय करत 'ही' जुनी कंपनी येतेय भारतात