महामारीत निवडणुका घेण्याची नियमावली तीन दिवसांत येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 05:05 AM2020-08-19T05:05:40+5:302020-08-19T05:05:52+5:30

बिहार विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असून ती निवडणूक त्याआधी घ्यावी लागणार आहे.

The rules for holding elections in the epidemic will come in three days | महामारीत निवडणुका घेण्याची नियमावली तीन दिवसांत येणार

महामारीत निवडणुका घेण्याची नियमावली तीन दिवसांत येणार

Next

नवी दिल्ली : सध्याची कोरोना महामारी सुरू असेपर्यंतच्या काळात घ्याव्या लागणाऱ्या निवडणुका कशा घ्याव्यात आणि त्यावेळी प्रचार कसा करावा, याविषयीची सर्वंकष नियमावली निवडणूक आयोग येत्या तीन दिवसांत तयार करणार आहे. मार्चमध्ये महामारीचा प्रकोप सुरू झाल्यापासून आयोगाने राज्यसभा व राज्य विधानसभांच्या अनेक पोटनिवडणुकांचे कार्यक्रम पुढे ढकलले होते. बिहार विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असून ती निवडणूक त्याआधी घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोग काय ठरवितो, याकडे राजकीय पक्षांचे आतुरतेने लक्ष आहे.
मध्यंतरी आयोगाने याविषयी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची मतेही मागविली होती. त्यानंतर आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केली. आयोगाने मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार मुख्य निवडणूक आयुक्त व दोन निवडणूक आयुक्तांच्या बैठकीत या विचारमंथनातून समोर आलेल्या साकल्याने विचार करण्यात आला आणि आवश्यक नियमावली तीन दिवसांत तयार करण्याचे निर्देश प्रशासकीय अधिकाºयांना देण्यात आले. आयोगाने पुढे असेही म्हटले की, आयोगाची ही नियमावली ढोबळ स्वरूपाची असेल. ज्या राज्यात प्रत्यक्ष निवडणूक होणार असेल तेथील मुख्य निवडणूक अधिकाºयांनी ही नियमावली डोळ्यापुढे ठेवून आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करून निवडणूक घेण्याची सविस्तर योजना तयार करावी, अशी अपेक्षा आहे.
सल्लामसलतींमध्ये व आयोगास पाठविलेल्या पत्रांमध्ये भाजपा वगळता बहुतांश अन्य राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष प्रचाराऐवजी फक्त डिजिटल प्रचार करू देण्याच्या कल्पनेस विरोध केला आहे.
>नवीन रुग्णांच्या संख्येत होतेय घट
भारतात दररोज कोविड-१९ रुग्ण वाढण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली असून रुग्ण बरे होण्याचा दरही ७३.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १९,७७,७७९ रुग्ण बरे झाले असून सोमवार आणि मंगळवारदरम्यान तब्बल ५७, ९३७ रुग्ण बरे झाले. केंद्रीय रणनीतीतहत निदान चाचणी, वेळीच अलगीकरण आणि प्रभावी वैद्यकीय उपचारामुळे मृत्यूदर कमालीचा कमी झाला आहे. याकामी राष्टÑीय सरासरीपेक्षा ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची कामगिरी सरस आहे.सरकारने पाच औषधी कंपन्यांना लसीच्या चिकित्सालयीन चाचण्या आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि लशीला मान्यता दिल्यास अपेक्षित किंमत याबाबत सर्वंकष अहवाल गुरुवारपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे.भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) सांगितले की, सोमवारपर्यंत ३,०९,४१,२६४ कोरोना निदान चाचण्या करण्यात आल्या. यापैकी सोमवारी ८,९९,८६४ चाचण्या करण्यात आल्या.
विशेष म्हणजे गेल्या चोवीस ८.९७ लाख विक्रमी चाचण्या करण्यात आल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात निदान चाचण्या करुनही संसर्गित रुग्ण आढळण्याचे प्रमाण साप्ताहिक राष्टÑीय सरासरीच्या ८.८१ टक्के आहे, असे आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी केलेल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे.
>५५,०७९ गेल्या चोवीस तासांत रुग्ण वाढले, तर ८७५ रुग्णांचा मृत्यू झाला. तथापि, हे प्रमाण आठवडाभराच्या तुलनेत कमी आहे. भारतातील कोविड-१९ रुग्णांची संख्या २७ लाखांवर पोहोचली आहे. वास्तविक रुग्ण आणि बरे होणाºया रुग्णांची संख्या अनुक्रमे ६७३,१६६ आणि १,३०४,६१३ आहे. कोरोनामुळे ५१,७९७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: The rules for holding elections in the epidemic will come in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.