आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमांची रेलचेल
By admin | Published: April 14, 2016 12:53 AM2016-04-14T00:53:56+5:302016-04-14T00:53:56+5:30
जळगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त गुरुवारी विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्यावतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Next
ज गाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त गुरुवारी विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्यावतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पीपल्स रिपब्लिकन पार्टीपीपल्स रिपब्लिकन पार्टीसह विविध दहा संघटनांतर्फे गुरुवारी सकाळी ८ वाजता रेल्वे स्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजू मोरे उपस्थित राहतील.मुक्ती फाउंडेशनमुक्ती फाउंडेशन व मीना हॉस्पिटलतर्फे गुरुवारी सकाळी १०.३० वाजता डॉ.नितीन धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेट बॅँकेच्या बाजूला मोफत अस्थिरोग शिबिर आयोजित केले आहे.भाजपा जिल्हा महानगरबाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी सकाळी ६.३० वाजता पालकमंत्री एकनाथराव खडसे रेल्वे स्थानकावरील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर नऊ मंडलांमध्ये दिवसभर विविध कार्यक्रम होतील. दुपारी १ वाजता रेल्वे स्थानकावरील बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सायंकाळी ५ वाजता जयंती मिरवणुकीत सहभागी होणार्या मंडळांच्या अध्यक्षांना आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.अजयभाऊ सपकाळे प्रतिष्ठानबाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अजयभाऊ सपकाळे प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार आयोजित केला आहे. हा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.उर्जा फाउंडेशनउर्जा फाउंडेशनतर्फे गुरुवारी सकाळी १० वाजता गौतम बुद्धांचे जीवनदर्शन घडवणारी चित्रप्रदर्शनी भरवण्यात येणार आहे. आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांच्या हस्ते चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन होईल.वीर सावरकर रिक्षा युनियनवीर सावरकर रिक्षा युनियनतर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रिक्षा रॅली काढण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता आकाशवाणी चौकातून रॅलीला सुरुवात होईल. रेल्वे स्थानकाजवळ रॅलीचा समारोप होणार आहे.