पद्मभूषण अनुपम खेर यांचे पुरस्कारांच्या विश्वासार्हतेवरून घुमजाव
By admin | Published: January 26, 2016 12:43 PM2016-01-26T12:43:02+5:302016-01-26T12:43:02+5:30
अनुपम खेर यांनी पाचच वर्षांपूर्वी, २६ जानेवारी २०१० रोजी आपल्या यंत्रणेमध्ये पुरस्कार म्हणजे चेष्टा झाल्याची भावना ट्विटरच्याच माध्यमातून व्यक्त केली होती
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - सोमवारी पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आणि पद्मभूषण पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना गौरवण्यात आले. खेर यांनी लगेच ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आणि या पुरस्कारामुळे कृतकृत्य झाल्याची भावना व्यक्त केली. एवढंच नाही तर ही आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी चांगली बातमी असल्याचंही त्यांनी सांगून टाकलं. यातला गमतीचा भाग म्हणजे याच अनुपम खेर यांनी पाचच वर्षांपूर्वी, २६ जानेवारी २०१० रोजी आपल्या यंत्रणेमध्ये पुरस्कार म्हणजे चेष्टा झाल्याची भावना ट्विटरच्याच माध्यमातून व्यक्त केली होती. कुठलेही पुरस्कार असोत, ते सिनेक्षेत्रातले असोत वा राष्ट्रीय असोत वा पद्म असोत, त्यांच्यामध्ये विश्वासार्हता राहिली नसल्याचे खेर यांनी खेदाने म्हटले होते.
मात्र, पाचच वर्षात त्यांनाच पद्मभूषण पुरस्काराने गोरवल्यावर मात्र, खेर यांना या पुरस्कारांची विश्वासार्हता पटलेली दिसते.
सोशल मीडियावर, या दोन्ही ट्विटसची चांगलीच चर्चा रंगली असून अजून तरी अनुपम खेर यांनी काही प्रत्युत्तर दिलेलं नाही वा आपली बाजू मांडलेली नाही.
AWARDS in our country have become a mockery of our system.There is NO authenticity left in any one of them.B it films, National or now PADMA
— Anupam Kher (@AnupamPkher) January 26, 2010
Happy, Humbled & Honoured to share that i have been awarded The PADMA BHUSHAN by the Govt. of India. Greatest news of my life:) #JaiHind
— Anupam Kher (@AnupamPkher) January 25, 2016