आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस-वे बनला लढाऊ विमानांचा रनवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 04:36 AM2017-10-25T04:36:10+5:302017-10-25T04:36:13+5:30
लखनऊ- उत्तर प्रदेशच्या आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस-वेचे सोमवारी धावपट्टीमध्ये रूपांतर झाले होते. या महामार्गावरून एरवी सुसाट वेगाने वाहने पळतात, पण आज तिथे भारतीय हवाई दलाच्या अत्याधुनिक फायटर विमानांच्या लँडिंग व उड्डाणाचा सराव करण्यात आला.
लखनऊ- उत्तर प्रदेशच्या आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस-वेचे सोमवारी धावपट्टीमध्ये रूपांतर झाले होते. या महामार्गावरून एरवी सुसाट वेगाने वाहने पळतात, पण आज तिथे भारतीय हवाई दलाच्या अत्याधुनिक फायटर विमानांच्या लँडिंग व उड्डाणाचा सराव करण्यात आला. युद्धाजन्य परिस्थितीत रस्त्यांवर विमान उतरविण्याची वेळ आल्यास त्याचा सराव असावा, यासाठी एक्स्प्रेस वेचे रनवेमध्ये रूपांतर करण्यात आले.हवाई दलाचे 'सी-१३0 सुपर हर्क्युलस' हे महाकाय मालवाहतूक विमानही एक्स्प्रेस वेवर उतरविण्यात आले. या विमानाची किंमत ९00 कोटी रुपये आहे. आज झालेल्या सरावामध्ये १६ विमाने सहभागी झाली होती. 'सी-130 सुपर हर्क्युलस' धावपट्टीवर उतरल्यानंतर त्यातून हवाई दलाचे गरुड कमांडो उतरले.या सरावासाठी एक्स्प्रेस वेच्या काही भागांमध्ये वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मिराज २000, जग्वार, सुखोई ३0 आणि एएन-32 या विमानांनीही एक्स्प्रेस वेवर लँडिंग व उड्डाण गेले. गेल्या वर्षीही या एक्स्प्रेस वेवर हवाई दलाच्या विमानांनी सराव केला होता.