गुजरातेत रूपानींचे सरकार सत्तारूढ
By admin | Published: August 8, 2016 04:40 AM2016-08-08T04:40:21+5:302016-08-08T04:40:21+5:30
मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसोबत गुजरातेत विजय रूपानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे नवीन सरकार सत्तारूढ झाले असून, मावळत्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल
अहमदाबाद : मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसोबत गुजरातेत विजय रूपानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे नवीन सरकार सत्तारूढ झाले असून, मावळत्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळातील नऊ मंत्र्यांना वगळत गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुका ध्यानात घेऊन नवीन मंत्रिमंडळात जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या नेतृत्वाखालील २५ जणांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना राज्यपाल ओ.पी. कोहली यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गुजरातेत पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रिपद निर्माण करण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी टिष्ट्वटरवरून मुख्यमंत्री विजय रूपानी आणि नितीन पटेल यांचे अभिनंदन केले आहे.
गुजरातेत २०१७ अखेर विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रूपानी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळात जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते. पटेल समुदायाच्या ८ नेत्यांचा, ओबीसीच्या ८, क्षत्रिय समुदाच्या तीन, आदिवासी समुदायाच्या दोन, तर ब्राह्मण, जैन, सिंधी आणि दलित समुदायाच्या प्रत्येकी एक-एक नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. विजय रूपानी हे गुजरातचे नववे मुख्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे सौराष्ट्र, उत्तर, दक्षिण व मध्य गुजरातला प्रतिनिधित्व देण्यात आले. नरोडा येथील आमदार निर्मला वधवानी या मंत्रिमंडळात एकमेव महिला सदस्य आहेत. मंत्रिमंडळात ८ कॅबिनेट, तर १६ राज्यमंत्री आहेत. उ महात्मा मंदिर येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला भाजपाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री हर्ष वर्धन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास, हरियाणाचे मनोहर लाल खट्टर, आनंदीबेन पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वृत्तसंस्था)
या मंत्र्यांना वगळले : आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळात असलेले रजनीभाई पटेल, वसुबेन त्रिवेदी, सौरभ पटेल, गोविंद पटेल, छत्रसिंह मोरी, ताराचंद छेडा आणि कांतीभाई गमीत यांना वगळण्यात आले आहे. ३ आॅगस्ट रोजी आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिला होता.
८ कॅबिनेट मंत्री : नितीन पटेल, भूपेंद्रसिंह चुडासामा, गणपत वसवा, बाबू बोखिरिया, दिलीप ठाकूर, जयश रादादिया, चिमण सपारिया आणि आत्मराम परमार.