ग्रामीण भागात ६९% घरे शौचालयाविना
By admin | Published: July 15, 2014 02:06 AM2014-07-15T02:06:15+5:302014-07-15T02:06:15+5:30
देशातील ग्रामीण भागातल्या सुमारे ६९ टक्के घरांमध्ये शौचालये नसल्याची माहिती पेयजल व स्वच्छता राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा यांनी राज्यसभेला दिली
Next
नवी दिल्ली : देशातील ग्रामीण भागातल्या सुमारे ६९ टक्के घरांमध्ये शौचालये नसल्याची माहिती पेयजल व स्वच्छता राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा यांनी राज्यसभेला दिली. २०११ च्या जनगणनेनुसार बिहारच्या ग्रामीण भागातील फक्त १८.६ टक्के घरांमध्ये शौचालये आहेत. झारखंडमध्ये ही टक्केवारी ८.३, छत्तीसगडमध्ये १४.८, ओडिशात १५.३ व उत्तर प्रदेशात २२.९ टक्के घरांमध्ये शौचालये आहेत.
या कार्यक्रमांतर्गत परिसराच्या स्वच्छतेकरिता दोन लाख रुपये उपलब्ध केले जातात. २०२२ पर्यंत सर्व ग्रामीण घरांमध्ये १०० टक्के स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करणे हे उद्दिष्ट आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)