बँकांमधील गर्दी कायमच

By admin | Published: November 18, 2016 01:54 AM2016-11-18T01:54:23+5:302016-11-18T01:54:23+5:30

नोटा बदलून घेण्यासाठी देशभरातील बँकांत गुरुवारीही तुफान गर्दी असल्याचे दिसून आले.

The rush in the banks forever | बँकांमधील गर्दी कायमच

बँकांमधील गर्दी कायमच

Next

नवी दिल्ली : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी देशभरातील बँकांत गुरुवारीही तुफान गर्दी असल्याचे दिसून आले. दरम्यान, बहुतांश बँकांची एटीएम यंत्रे बंदच असल्याचे दिसून आले.
काही एटीएममध्ये पाचशेच्या नोटा भरण्यात आल्या होत्या. तथापि, प्रचंड गर्दीमुळे त्या तात्काळ संपल्या. त्यामुळे ही यंत्रेही नोटांविना बंदच असल्याचे दिसून आले. नोटा बदलून घेण्यासाठी बोटावर न मिटणारी शाई लावण्याच्या निर्णयाची कालपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो शहरांत आज बँकांपुढील रांगा थोड्या कमी झाल्याचे दिसून आले. ज्यांनी एकदा नोटा बदलून घेतल्या त्यांना पुन्हा रांगेत उभे राहता आले नाही. त्यामुळे रांगा कमी झाल्या. एटीएममध्ये नोटा भरण्याच्या कामास गती देण्यात आल्याचे दिसून आले.
मालवाहतूक ठप्प,
ट्रक महामार्गावर उभे

नोटाबंदीमुळे देशभरातील मालवाहतूक ठप्प झाली आहे. वैध नोटा नसल्यामुळे ट्रक चालकांनी आपले ट्रक महामार्गावर उभे करून दिले आहेत. देशातील अनेक भागांत वस्तूंच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे.
सात दिवसांत एसबीआयकडे १,१४,१३९ कोटी
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर मोदी सरकारने बंदी घातल्यानंतर गेल्या सात दिवसांत स्टेट बँक आॅफ इंडियाकडे (एसबीआय) १,१४,१३९ कोटी रुपये नागरिकांनी जमा केले आहेत.
एसबीआयने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. १0 नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या काळात आपल्याकडे २४0.९0 लाखांची रोख रक्कम गोळा झाली आहे, असे बँकेने म्हटले. ८ नोव्हेंबर रोजी सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटांवर बंदी घातली होती. १0 नोव्हेंबरपासून बँका व्यवहारांसाठी खुल्या झाल्या.
१४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीमुळे देशाच्या अनेक भागांत बँका बंद होत्या. भारतातील सर्वांत मोठी बँक असलेल्या एसबीआयने १0 नोव्हेंबरनंतर ५,७७६ कोटींच्या नोटा बदलून दिल्या आहेत.
गेल्या सात दिवसांत पैसे काढण्याचे १५१.९३ लाख व्यवहार झाले. या व्यवहारांद्वारे नागरिकांनी १८,६६५ कोटी रुपये काढून घेतली आहे.
दिल्लीतील सोन्या-चांदीची दुकाने सलग सातव्या दिवशी बंद
पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत राजधानी दिल्लीतील सराफा व्यापाऱ्यांनी आपली दुकाने गुरुवारी सलग सातव्या दिवशी बंद ठेवली.११ नोव्हेंबरपासून ही दुकाने बंद आहेत. पाचशे आणि हजारांच्या नोटांवर बंदी घालण्यात आल्यानंतर काही सराफा व्यापाऱ्यांनी काळ्या पैशाचा बेकायदेशीर व्यवहार केल्याची माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाने दिल्लीतील सोन्या-चांदीच्या काही दुकानांवर छापे मारले होते.

Web Title: The rush in the banks forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.