मणिपूर हिंसाचार : विमानतळावर बस स्टँडसारखे दृश्य; 2500 रुपयांचे तिकिट मिळतंय 25,000 रुपयांना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 02:38 PM2023-05-08T14:38:29+5:302023-05-08T14:39:38+5:30

शहरातून बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या पाहता, विमानतळ सार्वजनिक बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनसारखे दिसते होते. बरेच लोक आपल्या विमानाची वाट पाहत जमिनीवर झोपलेले आणि बसलेले दिसून येत आहेत.

Rush to flee violence-hit Manipur drives Rs 2,500 air ticket to Rs 25,000 | मणिपूर हिंसाचार : विमानतळावर बस स्टँडसारखे दृश्य; 2500 रुपयांचे तिकिट मिळतंय 25,000 रुपयांना

मणिपूर हिंसाचार : विमानतळावर बस स्टँडसारखे दृश्य; 2500 रुपयांचे तिकिट मिळतंय 25,000 रुपयांना

googlenewsNext

मणिपूरमधील हिंसाचारामुळे तेथून घरी परतणाऱ्यांची संख्या अचानक अनेक पटींनी वाढली आहे. यामुळे इंफाळ ते कोलकाता विमान भाडे 25,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहे, जे सामान्य किमतींपेक्षा 8 पट जास्त आहे. साधारणपणे, दोन शहरांमधील विमान प्रवासाचे भाडे जवळपास 2500 ते 3000 आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात हिंसाचार सुरू झाल्यापासून, राज्यात राहणारे कोलकाताचे लोक कोणत्याही मार्गाने आपल्या घरी परतण्याची घाई करत आहेत.

इंफाळ विमानतळाबाहेर हजारो लोक आपल्या फ्लाइटची वाट पाहत होते. दुसरीकडे, इंफाळ आणि कोलकाता दरम्यान उड्डाण करणार्‍या विमान कंपन्यांनी सांगितले की, कोलकाता येथे जाणारी सर्व उड्डाणे सुरू आहेत. तसेच, ट्रॅव्हल एजंट म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीमुळे पुढील काही दिवस विमान भाडे कमी होण्याची शक्यता नाही. याशिवाय, काही विमान कंपन्यांनी सांगितले की, लोकांची मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त उड्डाणे चालविण्यात येत आहे.

दरम्यान, शहरात अजूनही इंटरनेट बंद आहे, दुकानेही बंद असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, रविवारी बाजारपेठा आणि दुकाने काही तास खुली होती. परंतु या काळात लोकांच्या हालचालींवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या होत्या आणि फक्त विमान तिकीट असलेले लोक घराबाहेर पडत होते. शहरातून बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या पाहता, विमानतळ सार्वजनिक बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनसारखे दिसते होते. बरेच लोक आपल्या विमानाची वाट पाहत जमिनीवर झोपलेले आणि बसलेले दिसून येत आहेत.

इंफाळ ते कोलकाता फ्लाइट फुल
विमानतळ प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, 4 मे ते 6 मे दरम्यान इंफाळ विमानतळावरून 108 उड्डाणे झाली. यादरम्यान, प्राधिकरणाने विमानतळावर बाजारभावाने वस्तूंची विक्री करणारे विशेष खाद्य आणि स्नॅक्स काउंटर देखील उघडले. येथे काही अडकलेल्या प्रवाशांना मोफत अन्न आणि पाण्याचेही वाटप करण्यात आले. तसेच, कोलकाता विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंफाळहून सुटणारी सर्व उड्डाणे फूल आहेत आणि तिकिटांची मागणी लक्षणीय वाढली आहे. इंडिगोने शनिवारी दोन विशेष उड्डाणे इम्फाळ ते कोलकाता आणि रविवारी अतिरिक्त एटीआर उड्डाणे चालवली.

Web Title: Rush to flee violence-hit Manipur drives Rs 2,500 air ticket to Rs 25,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान