Corona Vaccination: येत्या आठवड्यापासून भारतात मिळणार स्पुटनिक व्ही लस; जुलैमध्ये देशात सुरू होणार उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 05:55 PM2021-05-13T17:55:02+5:302021-05-13T17:55:47+5:30

Corona Vaccination: लसीकरण अभियानाला वेग देण्याचे प्रयत्न सुरू; देशात सुरू होणार तिसऱ्या लसीचा वापर

Russia Corona Vaccine Sputnik V Vaccine Has Arrived In India It Will Be Available In The Market Next Week | Corona Vaccination: येत्या आठवड्यापासून भारतात मिळणार स्पुटनिक व्ही लस; जुलैमध्ये देशात सुरू होणार उत्पादन

Corona Vaccination: येत्या आठवड्यापासून भारतात मिळणार स्पुटनिक व्ही लस; जुलैमध्ये देशात सुरू होणार उत्पादन

googlenewsNext

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला असून दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या आठवड्यात देशात दिवसाला ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. मागील आठवड्याच्या तुलनेत परिस्थितीत काहीशी सुधारणा असली तरी देशातील मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे मोदी सरकारनं काही दिवसांपूर्वीच स्पुटनिक व्ही लसीला मंजुरी दिली आहे. या लसीचा वापर पुढील आठवड्यापासून सुरू होईल.

भयावह, भयानक, भीषण! गंगा नदीजवळ वाळूत अनेक मृतदेहांचं दफन; स्थानिकांमध्ये घबराट

रशियात तयार झालेली स्पुटनिक लस पुढील आठवड्यात भारतीय बाजारांत उपलब्ध होईल. नीती आयोगाचे सदस्य असलेले डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबद्दलची माहिती दिली. पुढील आठवड्यापासून लोकांना स्पुटनिक लस टोचली जाईल. जुलैपासून भारतात स्पुटनिकचं उत्पादन सुरू होईल, असं पॉल यांनी सांगितलं. 'स्पुटनिक लस भारतात पोहोचली आहे. पुढील आठवड्यात ती बाजारपेठेत उपलब्ध होईल अशी आशा आहे,' असं पॉल म्हणाले.

सुट्टी न घेता बजावत होती कर्तव्य, आई बनल्यानंतर आठवड्यातच झाला कोरोनामुळे अंत

जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्यानं विविध स्तरांवर काम करत आहोत. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत २१६ कोटी डोस उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. यामध्ये कोवॅक्सिनच्या ५५ कोटी डोस, कोविशील्डच्या ७५ कोटी डोस, बायो ई सब युनिट लसीचे ३० कोटी डोस, झायडस कॅडिलाचे ५ कोटी डोस, नोवावॅक्सिनचे २० कोटी डोस, भारत बायोटेकच्या नेझल लसीचे १० कोटी डोस, जिनोवाचे ६ कोटी डोस आणि स्पुटनिकच्या १५ कोटी डोसचा समावेश असेल. याशिवाय आणखी देशांमधील लसीदेखील भारतात येतील, अशी माहिती पॉल यांनी दिली. 

Read in English

Web Title: Russia Corona Vaccine Sputnik V Vaccine Has Arrived In India It Will Be Available In The Market Next Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.